या कारणाने वाराणसी शहर बनले एकाच दिवसात सगळ्यात जास्त ट्रॅकिंग केल्या गेलेले शहर
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
इंटरनेट च्या काळात काही गोष्टी जाणून घेणे सहज सोप्या झाल्या आहेत. मोबाईल किंवा संगणकावर क्या माध्यमातून एका क्लिकवर आवश्यक गोष्टी समजून घेता येतात. भारताचे वाराणसी ( बनारस/ काशी ) शहर एकाच दिवशी सगळ्यात जास्त ट्रॅकिंग झालेले शहर बनले आहे. यामागे काय आहे कारण ?
भारताच्या आकाशात असं काही घडलं की त्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. उत्तर प्रदेशच्या वाराणसीत आकाशात असं काही घडलं की प्रत्येक जण इंटरनेटवर शोधत होता.
भारतातच नाही तर युरोप-अमेरिकेसह सर्व देशांतील लोकांचे यावेळी एकाच गोष्टीकडे लक्ष होतं. यूपीच्या आकाशात काय चाललं आहे. प्रत्येकजण इंटरनेटद्वारे हे लोकेशन शोधत होता आणि संध्याकाळी 4.30 च्या सुमारास एक वेळ अशी आली जेव्हा यूपीचं हे शहर संपूर्ण जगात सर्वाधिक शोधलं जाणारं ट्रॅकिंग लोकेशन बनलं.
नेमकं घडलं काय?
Flightradar24 नावाच्या एका ट्रॅकिंग वेबसाइटने दावा केला आहे की यूपीच्या वाराणसी शहरात सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता जे काही घडत होतंस ती जगातील सर्वात ट्रॅक केलेली घटना होती. Flightradar24 नावाची वेबसाइट जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात उडणाऱ्या कोणत्याही विमानाचं स्थान ट्रॅक करण्यास अनुमती देते. जगभरातील लोक याच वेबसाईटच्या माध्यमातून वाराणसीच्या आकाशातील विमानाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता जगभरातील सुमारे 29 हजार लोक एकाच वेळी या विमानाचा माग काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यात अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि भारतासह अनेक देशांतील युझर्सचा समावेश होता. जगभरातील युझर्सचंच नव्हे तर भारतीय वायुसेनेनेही त्याच्या प्रत्येक क्षणाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं होतं.
का ट्रॅक केलं हे विमान?
Flightradar24 पोर्टलचा दाव्यानुसार बांगलादेश हवाई दलाचं हे विमान AJAX1413. यूपीमधील वाराणसीमार्गे दिल्लीच्या दिशेनं जात होतं. यूपीची अनेक शहरं पार करून संध्याकाळी 6.30 च्या सुमारास गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर पोहोचलं. हे विमान भारतीय हवाई दलाच्या हर्क्युलस एअरक्राफ्ट हँगरवर थांबलं.
हे विमान दुसरं तिसरं कुणाचं नाही तर शेख हसीना यांचं होतं. या विमानाने शेख हसीना यांनी बांगलादेश ते भारत प्रवास केला आहे. हे विमान 26 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतं, तर कमाल वेग ताशी 644 किलोमीटर असू शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे विमान 2,417 मैल म्हणजेच सुमारे 3,700 किलोमीटरचे अंतर एकाच वेळी पार करू शकतं.