विद्यार्थ्यांनी माता, पिता ,गुरु, बंधू समजावून घेण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आदर्श घ्यावा. सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर सर .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – विद्यार्थ्यांनी माता , पिता , गुरू , बंधू यांना समजावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीरामाचा आदर्श घ्यावा , असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य हभप रामचंद्र महाराज सुपेकर सर यांनी केले आहे .
अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडाळणे येथे विद्यार्थ्यांसमोर सुपेकर सर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी घरातून बाहेर पडल्यानंतर आई-वडिलांचे दर्शन घेऊनच बाहेर पडावे, कारण आई-वडील हेच आपले प्रेरणास्थान आहे. त्यांनीच आपल्याला जन्म दिला असून तेच आपले पालन पोषण करते असल्याने, त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. म्हणूनच आई-वडिलांची सेवा ही ईश्वर सेवा मानून, कार्यरत राहण्यासाठी प्रयत्न करावेत, ढासळते कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी आज प्रभू रामाच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज म्हणून प्रभू रामाने वडिलांसाठी केलेला त्याग प्रत्येकाने समजावून घेतला पाहिजे.आदर्श विद्यार्थी होण्यासाठी त्यांनी सत्वशील राजा हरिश्चंद्र व त्यांचे गुरु वशिष्ठ यांची गोष्ट सांगितली. राजा असूनही हरिचंद्र राजाला आपल्या गुरूंच्या सत्वासाठी जीवनभर किती हालअपेष्टा सोसाव्या लागल्या,
हरिश्चंद्र तारा राणी।
वाहे डोमाघरी पाणी।
ही परिस्थिती एका राज्यावर आली , ती फक्त आपल्या गुरुचे सत्व टिकावे म्हणून.आपले गुरु वशिष्ठ मुनी यांच्या सत्वासाठी राजा हरिश्चंद्र काशीच्या बाजारात आपली पत्नी तारा आणि मुलगा रोहिदास यांच्या समवेत जनावराच्या बाजारामध्ये मला घ्या… मला घ्या… असा टाहो फोडीत होता. अखेर डोंब नावाच्या एका इसमाने त्यांना एक भार सुवर्णाला विकत घेतले, त्यांची पत्नी राणीतारा आणि मुलगा रोहिदास यांना अडीच भार सुवर्णाला कौशिक मुलींनी विकत घेतले, आणि आउटभार सुवर्ण विश्वामित्राला देऊन टाकले. व आपल्या गुरूंचे सत्व टिकविले, हा प्रसंग ऐकताना इयत्ता आठवीचे विद्यार्थी भाऊक झाले होते.
यावेळी पाडाळणे जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक अशोकराव वाबळे सर व प्रभारी मुख्याध्यापक काशिनाथ गभाले सर यांनी प्राचार्य श्री सुपेकर सर यांचा सत्कार केला.लालू भांगरे सर यांनी प्रास्ताविक केले तर प्रवीण साळवे सर यांनी आभार मानले. तर मुरलीधर बारामते सर, गोरख पथवे सर , अनिल सोनवणे सर हे गुरुजन उपस्थित होते. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक अशोकराव वाबळे सर यांचे वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.