खरंच असं असू शकत का ? पाताळ लोक चे द्वार सापडल्याचा दावा
तुम्ही जुन्या लोकांकडून नेहमीच ऐकत असाल की स्वर्गलोक आणि पाताळ लोक असे दोन लोक आहेत. तुम्ही चांगले केले तर मरणानंतर तुम्हाला स्वर्गात जागा मिळते. आणि पाप केल्यावर नरकात ( पाताळ ) . स्वर्गात देव राहतात आणि नरकात राक्षस. असे म्हटल्या जात असेल तरी खरंच हे दोन लोक अस्तित्वात आहेत असे कोणीच ठासून सांगू शकत नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओत पाताळ लोकाचे द्वार सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. आम्ही याचे समर्थन करत नाही.आणि आमचा अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही.
नरकात गेल्यावर पापांची शिक्षा मिळते, जी खूप कडक असते. पण पृथ्वीच्या खाली काय आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. फक्त असे सांगितले जाते की ते पृथ्वीच्या खाली अंधार आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक न संपणारी गुहा दिसत आहे.
एका अरुंद गुहेत विचित्र अंधार असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पाण्याने भरलेल्या गुहेच्या आत गेल्यावर कुठेतरी अंडरवर्ल्डमध्ये शिरल्याचा भास होतो. या गुहेचे दुसरे टोक नाही, फक्त एक अतिशय बारीक अशी वाट दिसत आहे. ही गुहा पाताळकडे जाण्याचा मार्ग असल्याचा दावा केला जात आहे.
‘पाताळ’चा मार्ग सापडला
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सुरुवात एका अरुंद गुहेतून होते. आत अंधार आहे आणि जसजसे पुढे जाऊ तसतशी वाट अरुंद होत चालली आहे. तर गुहा तळाशी पाण्याने भरलेली आहे. ज्यामधून ट्रिकिंगचा आवाज ऐकू येतो. गुहेच्या भिंतींवरील दगडांचा रंगही बदलला असून आत जाताना सर्व पाणी दिसत आहे. विशेष म्हणजे या गुहेचे दुसरे टोक दिसत नाही. अशा स्थितीत ती व्यक्ती थोडं अंतर गेल्यावर परतण्याचा निर्णय घेते. पुढे काय होईल हे पाहणे खूप भीतीदायक आहे?
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
हा व्हिडिओ victoria.exploria या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यावर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हे पाहिल्यानंतर माझा क्लॉस्ट्रोफोबिया वाढला.’ तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘भाऊ, तुम्हाला अशा ठिकाणी जाण्याची भीती वाटत नाही का?’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘हे पाहिल्यानंतर मला तर धडकीच भरली आहे.’ तर आणखी एकाने लिहले आहे की, ‘हे शक्यच नाही, असे कसे होऊ शकते?’