मुख्यमंत्री लाडकी बहीन आणि घरकुल आवास योजनेपासून फासिपारधी, कैकाडी आणि वडार समाज वंचित
पावसामुळे खचलेल्या भिंतीआड जीवन तळमळत आहे
बिलोली (प्रतिनिधि):
तालुक्यात गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून राबवल्या जात आहे, पण त्याची प्रत्यक्षरित्या किती महिलांना फायदा झाला याचा कुठेच नोंद आढळत नाही. बिलोली येथे गेली ४० ते ४५ वर्ष अधिवास राहिलेले फासीपारधी, कैकाडी आणि वडार आधीची झोपडपट्टी नवीन (माता रमाई नगर) वस्ती आहे. येथे शासनाची योजनाच काय तर येथील वस्ती कुठल्या क्षेत्रात मोडते ह्याचेपन पंचायत समिती, बिलोली येथे नोंद नाही.
येथील सर्व निराश्रित कुटुंबाला पिवळा रेशन कार्ड खूप मोठ्या संघर्षाने मिळाले असून पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, महात्मा फुले आवास योजना यासारख्या योजना रखडत पडलेल्या असल्यातरी त्याचा फायदा येथील आदिवासी भटक्या समाजाला आद्याप मिळालेल्या नाहीत.
तेथील वडार, कैकाडी व फासिपारधी समाज पुर्ण पणे भीक मागून उदरनिर्वाहावर अवलंबून आहे. त्यासाठी त्याना गावोगावी भटकंती करुन पोट भरावे लागल्याने शासनाच्या कुठल्याच योजनेचा फायदा होत नाही. राजकीय पुढारी फक्त मतदाना पुरतेच येऊन मत मागतात आणि मते एकदा मिळाली की, पुन्हा कुनीच याभागात फिरकत पण नाही, डूकरांनी त्यांचे अंगण पिंजून निघालेले आहे.
त्यासाठी स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदरील शासकीय योजना जन सामान्यांपर्यंत पोहचवण्यात हातबार लावावा आणि बिलोली (माता रमाई नगर)च्या तालुक्याचे मुळ अधिवास रहिवासी असलेल्या वडार, कैकाडी आणि फासीपारधी समाजातील नागरिकांना शासकिय योजनांचा लाभ मिळवून द्यावा यासाठी साप्ताहिक नवप्रहारचे पत्रकार पंचशील काळे यांना समस्त वडार, कैकाडी आणि फासीपारधी समाजातील लोकांनी विनवणी करुन अपेक्षा व्यक्त केली आहे.