क्राइम

वस्तीगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर मृत्यू

Spread the love

लातूर  / नवप्रहार डेस्क

                  वस्तीगृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता. ही बाब तिच्या वडिलांना सांगण्यात आली होती. पोलिसांनी ह्याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण मुलीच्या वडीलानी आक्षेप घेत इन कॅमेरा पीएम करण्याची मागणी केली. इनकॅमेरा  पीएम झाल्यावर मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी वस्तीगृह संचालिकेसह तिच्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करून दोन्ही मुलांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील  कस्तुरबा कन्या छात्रालयात मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहातील एका अल्पवयीन मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याबाबत काही दिवसांपूर्वी आक्समात मृत्यूची नोंद  करण्यात आली होती.पण मयत मुलीच्या वडीलांनी संशय घेत दुसऱ्यांदा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यास सांगितले. या शवविच्छेदन अहवालातून संबधित मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यावरुन वस्तीगृह संचालिकेसह तिच्या दोन मुलांवर विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आशा सदाशिव गुट्टे, शंकर सदाशिव गुट्टे आणि विठ्ठल सदाशिव गुट्टे अशी संशयीतांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे.

कस्तुरबा कन्या छात्रालय नावाचे वस्तीगृह आहे. तिथे एका मजुराच्या दोन मुली 2023 पासून राहत होत्या. 28 जून रोजी सकाळी वसतीगृह संचालिकेने मुलीच्या वडीलांना त्यांची मुलगी दोरीत पाय अडकून पडल्याने तिला सरकारी दवाखान्यात अॅडमिट केले आहे, असे सांगितले. वडील दवाखान्यात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी मुलगीचे निधन झाल्याचे सांगितले.

लातूर येथील शासकीय रुग्णालयात मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले होते. परंतु, मुलीच्या वडीलांनी मुलीचे इन कॅमेरा शवविच्छेदन करावे, अशी मागणी केली. लातुरमध्ये तशी सोय नसल्याने सोलापूर येथील रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला. तिथे मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळले. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. या वरुन पोलिसांनी वसतीगृह संचालिका व तिचे दोन मुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. दरम्यान मयत मुलीच्या बहिणींने तिच्या बहिणीवर रात्री घडलेला प्रसंग वडिलांना सांगितला असून फिर्यादीत त्यांनी तो नमुद केला आहे. अधिक तपास लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे हे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close