होमगार्ड जवानांना 365 दिवस रोजगारची प्रतीक्षा
होमगार्ड कडून आमदार खासदार यांच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर*
पावसाळी अधिवेशनात आमदार बचू कडु यांचे कडून मुदा उपस्थित*
तरीही शासनाकडून अंनदेखी*
*शासनाच्या खोट्या आश्वासनाने सैनिकांमधे असंतोष*
पवनार प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड जवानाना नियमित रोजगार द्यावा या मगणीचे निवेदन आमदार खासदार यांच्या वतीने होमगार्ड तर्फे महाराष्ट्र शासनास प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे 200 हून अधिक निवेदन देण्यात आले सद्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने मां आमदार बचु कडु यांच्या कडून अधिवेशनात मुदाही उपस्थित करण्यात आला परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीने तारीख पे तारीख देवून होमगार्ड ची अवहेलना करण्यात येत असल्याने होमगार्ड सैनिकांमद्ये असंतोषाची लाट पसरत आहे.महाराष्ट्र राज्यात गृहरक्षक दलाचे सुमारे 53 हजार (होमगार्ड) जवान आहेत आजपर्यंत होमगार्ड सैनिकांनी अनेक आंदोलन केली अनेकदा मोर्चेही काढले गेल्या अनेकदा आमदार खासदार गृहमंत्री यांना निवेदन दिले परंतु या कडे प्रशासना कडून या सगळ्या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होमगार्ड जवानांकडून होत आहे. होमगार्ड जवान शासनाच्या अडचणी वेळी आपले सगळे काम बाजूला सारून बंदोबस्त करण्यासाठी उपस्थित होतात मोहरम, ईद, पोळा, गणेशोत्सव. नवरात्र निवडणूक इत्यादी बंदोबस्त चोख पने पार पाडतात होमगार्ड यांना सगळ्या सुविधा पुरविण्यात शासन अपराजित असल्याचे दिसून येत आहे,अनेकदा बंदोबस्तावर जाताना किंवा येताना अपघात होऊन कित्येक जवान मृत्युमुखी झाले कित्येक जवान जखमी झाले परंतु त्यांना प्राथमिक उपचार सुधा स्वतःच करावा लागत आहे कर्तव्यावर जवान मृत्युमुखी झाल्यास शासनाकडून पणास लाख रुपये देण्याची घोषणा झाली परंतु अद्यापही त्याचा फायदा काही जणांना झाला नसल्याची खंत परिवाराकडून करण्यात येत आहे, होमगार्ड संघटनेची सहा डिसेंबर 1946 रोजी स्थापना मोरारजी भाई देसाई यांच्या कडून निष्काम सेवा या ब्रीद वाक्याने झाल्याने होमगार्ड जवानांना अद्यापही तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे केवळ महाराष्ट्र सोडून इतर अनेक राज्यात होमगार्ड सैनिक हे कायमस्वरूपी काम करत आहे तर मग महाराष्ट्रात का नाही असा प्रह होमगार्ड सैनिककांकडून केल्या जात आहे. महाराष्ट्रातील होमगार्ड मात्र काही नियमित बंदोबस्त पुरतेच देण्यात येत आहे इतर वेळी होमगार्ड जवानांना आपल्या परिवाराच्या उदर निर्वाह करीता कामाची भटकंती करावी लागत आहे त्यातच बंदोबस्त आल्या वेळी नियमित असलेले काम सोडून बंदोबस्तावर उपस्थित राहावे लागते अन्यथा होमगार्ड मुंबई कलम कायदा1946 /16ब अन्वये तत्काळ कारवाईचे आदेश पारित करण्यात येते परिणामी इकडे आड तिकडे विहीर अशीच काहीशी स्थिती होमगार्ड सैनिकांची झालेली चित्र सद्या दिसून येत आहे
महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनचेकडून 180 दिवस काम देण्याचे उपाययोजना असल्याचे विधिमंडळात आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप पर्यंत यावरही कुठलीच ठोस पावले शासनाच्या वतीने उचलण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे.
होमगार्ड सैनिकाना अपघात दुखापत प्रकरणी शासनाकडून प्राथमिक उपचार कर्तव्यावर रुजू असताना मृत पावल्यास अथवा अपघातात मृत पावल्यास परिवारास ठोस आर्थिक मदत
निवृत्ती काळानंतर इतर कर्मचारी प्रमाणे सन्मानाने जगण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी तसेच 365 दिवस काम देण्यात यावे अश्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या असल्या तरी शासन या कडे लक्ष देवून होमगार्ड जवानांच्या 20 वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या दूर करणार की अजून तारीख पे तारीख चालवणार या कडे सर्व होमगार्ड सैनिकांचे लक्ष लागले आहे.