डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वान दिना निमित्त 68 रक्तदात्यांनी केले रक्तदान!
मोर्शी / ओंकार काळे
फुले शाहू आंबेडकर विचार मंच तालुका मोर्शी याच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 6डिसेंबर संविधान प्रणेते डाँ. बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरीनिर्वाण दिनाचे निमित्त रक्तदान शिबीर नगर परिषद मराठी शाळा येथे आयोजित करण्यात आले. होते.आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डाँ. पोतदार साहेब यांनी सर्वप्रथम बाबासाहेबाच्या फोटोला हारर्पण केले.आणि रक्तदानाला सुरुवात झाली.बाबासाहेबाचा 68वा महपरिनिर्वाण दिन आणि रक्तदान करणारे पण 68 रक्तदाते हा योगायोग साधून आला.रकदान श्रेष्ठदान ही घोषणा आज काळाची गरज ओळखून हा विशेष कार्यक्रम घेन्यात आला. आणि बाबासाहेबाना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भाऊ वाघमारे,विशाल बडोडेकर,चंदन राऊत, बबलू रामटेके,पंकज कुहिरे, ओमप्रकाश निस्वादे,पंकज राऊत, गोपाल वासनिक,किशोर इंगळे शुभम , पाटील, अमर बादशे,लांडगे साहेब, यानी अथक परिश्रम घेतले.