रांधेच्या सरपंच पदी सेवानिवृत्त शिक्षक दिलीपराव आवारी यांची बिनविरोध निवड .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – रांधेच्या सरपंच पदी राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते दिलीपराव आवारी गुरुजी यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली .
गांधी ग्रामपंचायतची साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत प्रत्येक वर्षी प्रत्येक सदस्याला संधी देण्याचे एकमतांनी ठरवण्यात आले होते . त्यानुसार प्रत्येक वर्षी सरपंच व उपसरपंच पदी सदस्यांना संधी देण्यात आली . त्यानुसार ज्येष्ठ सदस्य व आदर्श शिक्षक आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित दिलीपराव आवारी गुरुजी यांना संधी देण्यात आली .सरपंच पदी निवड झाल्यानंतर दिलीपराव आवारी गुरुजी यावेळी म्हणाले की , आजची संधी माझ्यासाठी मोलाची व अनमोल अनमोल आहे . आज रांधे गावच्या सरपंच पदी माझी निवड करून माझ्या वर गावाने व मंडळाने जी मला विकास कामे करण्यासाठी जी जबाबदारी दिली, तिचे मी सोनं करीन , असे ही शेवटी आवारी म्हणाले .
यावेळी मच्छिंद्र चौधरी , माधव आवारी, अरूण आवारी , राजाराम झिंजाड , आबा आवारी, अनवर शेख , हौशाभाऊ आवारी, सुभाष आवारी , बाळासाहेब साबळे ,भाऊसाहेब आवारी , अमोल आवारी ,शरद आवारी, बाळासाहेब आवारी , संतोष काटे, प्रविण साबळे, अनिल आवारी , हौशाभाऊ आवारी , किरण आवारी, सदानंद आवारी , विजय आवारी ,सुरेश थोरात, विनोद फापाळे ,प्रमोद गायकवाड , अमोल शिंदे , अंकुश साबळे , वरूण सोनवणे ,चांगदेव थोरात , संभाजी आवारी , शाहरुख शेख , राजेंद्र आवारी, रेश्मा शेख , उपसरपंच अश्विनी आवारी , जयश्री साबळे , सुनिता आवारी , मंडलाधिकारी पवार, पोलीस कॉन्स्टेबल लौढे , कामगार तलाठी जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते .