१६ तालुक्यातून दिव्यांग एकत्र येऊन वाढदिवस केला साजरा
बिलोली (प्रतिनिधि):
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ, महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांचा वाढदिवस सोहळा साजरा करतेवेळी पावसाचे दिवस असतांना सूध्दा तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थितीत होते.
तब्बल १६ तालुक्यातील दिव्यांगानी पावसाचा विचार न करता वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते डाकोरेंच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करून त्यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला. बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती समितीचे तथा पोर्टल प्रतिनिधी राहुल साळवे जिल्हाध्यक्ष, ज्ञानेश्वर नवले, जि.उपाध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार, तालुकाध्यक्ष व शाखा प्रमुख असे अनेक कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र, संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील व रेवा रामोड यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी डाकोरे म्हणाले की, आज भर पावसाचे दिवस असतांना ही आपल्या प्रेमामुळे १६ तालुक्यातून दिव्यांग वृद्ध निराधार आणि शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून माझा वाढदिवस साजरा केला तुमच्या ऋणात मी सदैव राहीन. आपल्या कार्यासाठी सतत संघर्ष करणार तसेच दिव्यांग वृध्द निराधार बांधवांच्या अनुदानात वाढ व्हावी म्हणून मुंबई मंत्रालय येथे दिनांक १० जुलै २०२४ रोजी मंत्रालय घेरावा आंदोलन आयोजीत होता. या आंदोलना करीता नांदेड जिल्ह्यातील २५० दिव्यांगानी नाव नोंदणी केलेली होती. पण अचानक नैसर्गिक कृपेमुळे मुंबईमध्ये रेड अलर्ट जाहीर झाला होता. त्यामुळे मोजकेच शिष्ट मंडळ मुंबई च्या मोर्चा करीता जातील आपण कोणी जाऊ नये असे सांगून सुद्धा माझ्या नांदेड जिल्ह्यातील ५० दिव्यांगानी सहभाग घेतला. तसेच दिव्यांग मंत्रालय सचिव यांच्या सोबत चर्चा करून त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणतीही तरतूद न केल्यामुळे येत्या ०९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ व दिव्यांग बेरोजगार कल्याण कृती समिती च्या वतीने अनेक प्रश्नां साठी मोर्चाचे आयोजन केले आहे.
यावेळी शेकडो दिव्यांग बांधव व मित्रपरिवार ऊपस्थित होते याचे नवल पण त्यांनी मांडले आहे.