समाजकार्यानेच मिळते खऱ्या सुखाची अनुभूती : रो. डॉ. सुरेश साबु
“नूतन अध्यक्षा रो. मिनल बोरा यांनी समाजसेवेचे संकल्प व्यक्त केले”
अहमदनगर – रोटरी प्रियदर्शिनी क्लबच्या नूतन अध्यक्षा रो. मिनल ईश्वर बोरा आणि सचिव रो. स्वाती महेश गुंदेचा यांचा पदग्रहण सोहळा काल मोठ्या उत्साहात हॉटेल न्यू स्वीट होम, नगर-पुणे हायवे च्या वातानुकूलित प्रशस्त हॉलमध्ये संपन्न झाला.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. सुरेश साबु आणि डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी रो. निर्मला साबु यांच्या हस्ते तर असिस्टंट गव्हर्नर रो. किरण कालरा यांच्या उपस्थितीत क्लबचा २३ वा पदग्रहण समारंभ पार पडला.
यावेळी प्रियदर्शिनी क्लब च्या वतीने पदग्रहण समारंभास उपस्थितीत PDG रो. शिरीष रयते, PDG रो. प्रमोद परिख, रो. एस व्ही जोशी (रेवन्यू डिस्ट्रिक्ट को-ऑर्डिनेटर), असिस्टंट गव्हर्नर प्रसन्ना खजगीवाले, पुरषोत्तम जाधव, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स रो. अमित वैद्य (मेंबरशिप डेव्हलपमेंट चेअर), रो. क्षितिज झवारे (TRF), रो. मनीष नायर (फेलोशिप), रो. ईश्वर बोरा (स्पोर्ट्स), रो. हरीश नायर (क्लब लीडरशिप प्रोग्रॅम) आणि विविध क्लबचे अध्यक्ष व सचिव रो. डॉ. कुणाल कोल्हे, रो. सुनील कटारिया, रो. नितीन थाडे, रो. सुभाष गर्जे, रो. अजय पिसुटे, रो. मर्लिन एलिशा, रो. राजीव चिटगोपिकर, रो. निखिल कुलकर्णी, रो. डॉ. देवचक्के, रो. उज्ज्वला राजे यांचे सन्मान करण्यात आले.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेश साबु यांनी आपल्या भाषणात सांगितले, “जगातील सर्व सुखं तुमच्या पायाशी लोळण घेत असली तरी तुम्हाला रात्री शांत झोप लागेलच असे नाही. पण जर तुम्ही काही समाज कार्य करीत असाल, गरजवंतांना मदत करीत असाल तर हा सुखी माणसाचा सदरा तुम्हाला नक्कीच शांत झोप व आनंद देईल. रोटरी परिवार हेच कार्य अविरतपणे करीत आलं आहे व पुढेही करत राहील.” रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. सुरेश साबु यांनी घेतलेल्या “अब की बार एक लाख पार” या मधुमेह तपासणी शिबिराच्या उपक्रमाचे समर्थन करण्यासाठी, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीने डॉ. स्मिता तारडे यांच्या वैद्यकीय टीमच्या मदतीने हॉलच्या बाहेर मोफत मधुमेह तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेश साबु यांच्या हस्ते करण्यात आले आणि सर्व उपस्थित मान्यवर व नगर-पुणे हायवेवरील प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
मावळत्या अध्यक्षा रो. देविका रेळे आणि सचिव प्रभा खंडेलवाल यांनी मागील वर्षात केलेल्या विविध सेवाकार्याचे कौतुक करुन नवीन कार्यकारीणीला अधिकाधिक प्रकल्प राबवण्याचा विश्वास दिला. त्यांनी हॅपी स्कूल प्रोजेक्ट, आटा चक्की आणि शिवण यंत्रांचे वाटप यासारखे अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि वर्षभरात मदत करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार मानले. नूतन अध्यक्षा रो. मिनल बोरा यांनी वर्षभरात अनेक उत्तमोत्तम समाजकार्य करण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असल्याचे सांगितले. सचिव रो. स्वाती गुंदेचा यांनी आभार प्रदर्शन केले. रो. डॉ. स्वाती चंगेडिया यांनी अतिशय सुंदर रित्या सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात १० नवीन महिला सदस्यांचे रोटरी प्रियदर्शिनी परिवारात स्वागत करण्यात आले. यावेळी अहमदनगर शहरातील रोटरी प्रियदर्शिनी, रोटरी सेंट्रल, रोटरी मिडटाउन, रोटरी मेन, रोटरी इंटेग्रिटी, रोटरी डिग्निटी, रोटरी इ-क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ चे सर्वच मान्यवर सदस्य परिवारासहित उपस्थितीत होते. त्याचप्रमाणे नगर शहरातील अनेक मान्यवरांनी देखील आवर्जून कार्यक्रमास उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.
फोटो ओळ – रोटरी प्रियदर्शिनी च्या पदग्रहण समारंभात मावळते अध्यक्ष देविका रेळे नूतन अध्यक्ष मिनल बोरा यांना चार्टर प्रदान करताना डावीकडून रो स्वाती गुंदेचा, डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी रो निर्मला साबू, नूतन अध्यक्ष रो मिनल बोरा, डिस्ट्रिक्ट गवर्नर रो डॉ सुरेश साबू, रो देविका रेळे, उपप्रांतपाल रो किरण कालरा, रो प्रभा खंडेलवाल.