हटके

ऑन कॅमेरा रिपोर्टिंग करत असलेल्या रिपोर्टर ला त्याची गर्लफ्रेंड दुसऱ्या बॉयफ्रेंड सोबत दिसते तेव्हा

Spread the love

          वर्तमान काळात विवाहबाह्य संबंध कळी काही नवीन बाब राहिली नाही.अनेक महिला ,तरुणी , तरुण पुरुष आपल्या पार्टनर व्यतिरिक्त अन्य लोकांशी संबंध ठेवत आहेत.या अनैतिक संबंधाचा शेवट भयानक असतो हे समजत उमजत असतांना देखील ते अशी कृती का करतात हे न समजण्या पलीकडे आहे. कदाचित पाश्चात्य संस्कृती किंवा टीव्ही सिरीयल मध्ये दाखविण्यात} येणाऱ्या सीन्स चा हा परिणाम म्हणू शकतो . पण या गोष्टीचा शेवट मात्र भयानाकच असतो हे माहीत असतांना सुद्धा अश्या घटना घडत असतात.

             पण असे प्रसंग जेव्हा एक पार्टनर स्वतः उघड्या डोळ्यांनी पाहतो त्यावेळी त्याची मनस्थिती काय असेल याची कल्पना न केलेलीच बरी ! सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ! यात एक चॅनल मध्ये रिपोर्टिंग करणारा पत्रकार एका चित्रपट गृहाबाहेर लोकांचे मत जाणून घेत असतांना अचानक त्याच्या समोर त्याची गर्लफ्रेंड येते. तेव्हा तो तिला येथे कशी  काय ? आणि हा कोण आहे ? असा प्रश्न विचारतो तेव्हा ती निर्लज्ज पणे हा माझा मित्र असल्याचे सांगते.

शल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लग्न, डान्स, प्रॅन्क, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओंचा सामावेश असतो. पण सध्या एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्यानंतर रिपोर्टर भावनिक होताना दिसतो आणि रिपोर्टिंग करता करता थांबतो. कॅमेरामनला कॅमेरा बंद करायला तो सांगतो, तेवढ्यात त्याच्या डोळ्यातही पाणी आल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “हे दु:ख आमच्याच वाट्याला का येतं?, बेस्ट फ्रेंड या संकल्पनेला बॅन केलं पाहिजे, कॅमेरामन वेडा आहे, व्हिडिओ व्हायरल केला” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.दरम्यान, आपल्या जोडीदाराला किंवा नवऱ्याला धोका देऊन दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणारे पुरूष किंवा महिलेचे अनेक प्रकार याआधी समोर आले आहेत. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील मुलगी ही रिपोर्टरची गर्लफ्रेंड आहे असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close