*मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब श्री जितीन रहमान सर यांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नेरी ला भेट……
आर्वी/ प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत निर्मल ग्राम पुरस्कार योजनेसाठी ग्राम संसद नेरी येथे भेट दिली असता शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद… विद्यार्थ्यांनी केले सीईओ साहेबांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत.. साहेबांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची केली पाहणी… शाळेचा हिरवागार व स्वच्छ परिसर पाहून केले कौतुक…विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची केली पाहणी त्यामध्ये विशेषतः शौचालय, पोषण आहार, सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन, डिजिटल क्लासरूम, वॉटर प्युरिफायर, परसबाग, शाळेतील सौर ऊर्जा पॅनल, वृक्षारोपन व खेळाच्या मैदानाची केली पाहणी…
शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री पांडे सर यांनी शाळेत
घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची दिली माहिती..
शाळेतील शिक्षक श्री प्रफुल कांबळे सर, सौ. पल्लवी वाकेकर मॅडम व श्री विवेक कहारे सर यांच्याशी केली चर्चा..शाळेला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही याबद्दल केले आश्वस्त…
सीईओ साहेबांच्या भेटी दरम्यान मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती भडंग मॅडम, गटविकास अधिकारी मा. सौ मरसकोल्हे मॅडम व इतर जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सचिव श्री शेंद्रे साहेब, ग्रामपंचायत सदस्य गण, व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
शाळेच्या गुणवत्तेबद्दल सीईओ साहेबांनी केले समाधान व्यक्त केले