शहरातील गांधी चौक येथील महात्मा गांधी यांचा पुतळा बदलविण्यात यावा. आशु गोंडाने
भंडारा / हंसराज
शहरातील मुख्य चौकामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा जीर्ण अवस्थेत असल्याने अनेकदा आपल्या कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने नगर परिषद सर्वसाधारण सभा वर्ष २०२२ मध्ये सर्वानुमते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बदलविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. ह्या ठरवला २ वर्षे पूर्ण झाले असता आता पर्यंत आपल्या कार्यालयाद्वारे ह्या विषयावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
दि. ०८ जुलै २०२४ रोजी अज्ञात व्यक्ती कडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची शती झालेली आहे. यावर वेळेवर कार्यवाही झाली असती तर हा प्रकार घडला नसता. तरी आपणास विनंती करण्यात येते की, गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा तत्काळ बदलून नवीन धातूचा पुतळा बसविण्यात यावा असे निवेदन देण्यात आले. हया प्रसंगी भाजप जिल्हा महामंत्री आशु गोंडाने , जिल्हा उपाध्यक्ष रब्बी चढ्ढा , शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर , भाजपा वरिष्ठ नेते रामदासजी शहारे , प्रशांत निंबोळकर , रोनक उजवणे , शैलेश मेश्राम , शिव अजबले , आकाश फाले अजय कावळे आदि उपस्थित होते .