क्राइम
माझ्या पतीची मन्मथ ने हत्या करून त्याचा मृतदेह तळ्यात फेकला पत्नीचा आरोप
बिलोली / प्रतिनिधी
माझ्या पतीची मन्मथ याने हत्या करुन त्याचा मृतदेह तळ्यात फेकल्याचा आरोप मृत्यूकाची पत्नी धम्माशिला जिने केला असून आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.
धम्माशिला हिने पोलिसात तक्रारीत केलेल्या आरोपानुसार तिचा पती गौतम सोनकांबळे आणि मन्मथ हे मित्र असल्याने मन्मथ मारोती पंडिलवाड याचे त्यांच्या घरी येणेंजाणे होते. मन्मथ हा नेहनीच मृतकाच्या घरी यायचा आणि त्याला मटण खाण्याच्या बहाण्याने घेऊन जायचा.
मी धम्मशिला गौतम सोनकांबळे वय 36 वर्ष व्यवसाय घरकाम रा. आरळी ता. बिलोली जि. नांदेड (जात महार) मो न 9172983580
दि.07/07/2024 रोजी रात्री 09:00 वा सुमारास मन्मथ हा नेहमी प्रमाणे माझ्या घरी आला व माझ्या पतीला म्हणाला की गौतम दादा एक अर्जट काम आहे थोड बाहेर जायचे आहे तु मोटार सायकल काढ आपण अर्ध्या तासात परत येवूयात रात्री 09:00 वा सुमारास बाहेर जाण्यासाठी मी माझ्या मयत पतीला व मन्मथ ला विरोध केला असता मन्मथ मला म्हणाला की आक्का आर्धा तासाचा काम आहे, आम्ही लगेच परत येणार आहोत असे म्हणुन ते दोघे निघुन गेले. सदर दिवशी माझे मयत पतीचा मोबाईल हा घरीच राहील्यामुळे मला रात्री त्यांच्या शी संपर्क करता आला नाही.
दुसरे दिवशी दि. 08/07/2024 रोजी सकाळ पासुन मी गावात माझ्या पतीचा शोध घेत होते परंतु ते न मिळाल्याने मी मन्मथ च्या घरी विचारण्यासाठी गेले असता त्याच्या घराला कुलुप लावलेले होते. मी परत गावात शोध घेत असताना आमच्या गावातील नदी जवळ मन्मथ मला आमची गाडी घेवुन जात असतांना दुपारी 02:00 वा सुमारास मिळून आला. आमचे मोटार सायकल वरील नंबर प्लेट चिकट पट्टीने झपुन टाकलेली मला दिसली. मी मन्मथला माझे पती बाबत विचारले असता तो मला उध्दट भाषेत म्हणाला की, मला माहीती नाही, तुझा नवरा कोठे गेलेला आहे. मी मन्मथला परत जाब विचारला की माझा नवरा रात्री तु सोबत घेवुन गेलेला आहेस कुठे आहे ते सांग. असे म्हणाल्याने मन्मथने मला तुझा नवरा बिलोलीतील कोर्टाकडील तळ्याकडे जावुन बघ असे म्हणाला. मी संशयाने घाबरुन गेले व मन्मथला तिथेच थांबवून माझा भाउ नामे संदिप लक्ष्मण ढवळे, माझी बहीण नामे शिला दिलीप
वाघमारे व माझा मोठा मुलगा नामे अमोल यास बोलावुन घेतले रत्यावरच मन्मथची व आमची वादावादी होत असताना मन्मथ हा माझा भाऊ नामे संदिप लक्ष्मण ढवळे यास धमकी देवुन म्हणाला की, गौतमला मारुन कोर्टामागील तळयात फेकून दिली आहे. तुम्ही जर गडबड केलात तर तुम्हालाही तलवारीने आताचे आताच हानुन टाकतो सालेहो. मन्मथ ने माझी बहीण शिला हिच्या हाताला धरुन झटापटी सुरु केली असता शिलाच्या हातावर जखमा झालेल्या आहेत. आम्ही प्रकरण वाढत असल्यामुळे लागलीच गावातील सरपंच नामे सदाशिव बोडके व पोलीस पाटील नामे आकाश सिद्राम मरखेले यांना बोलावुन सदर बाब कळविली, गावातील बरेच लोक जमा होवुन मन्मथला विचारले असता मन्मथने सांगीतले की, माझे पती नामे गौतम यास मारुन तळयात फेकले आहे. माझे पतीला पोहता येत नाही असे माझ्या लक्षात येताच मला रडु आवरले नाही.
मी जोरान ओरडायला।लागली असता तेथे बरेच आजु बाजुचे लोक जमा झाले. त्यानंतर गावातील मंडळीनी सदर बाब बिलोली पोलीस ठाण्यास माहीती दिली आहे. त्यानंतर माझे नातेवाईकांनी व गावातील लोकांनी माझे पती या तळयात व इतरत्र शोध घेत असतांना आज दि. 09/07/2024 रोजी सकाळी 04:45 वा. सुमारास पोलीसांना एक बॉडी बिलोली कोर्टामागील तळ्यातील पाण्यावर तरंगत असतांना दिसुन आली ती बॉडी तळ्याचे बाहेर काढून ठेवली असता। मी ती बौडी प्रत्यक्ष पाहीली असता माझे पती गौतमचीच असल्याची मला खात्री झालेले आहे.
तरी माझे पती नामे गौतम विठूंठल सोनकांबळे वय 40 वर्ष रा. आरळी हे दलीत महार समाजाचे असल्याचे माहीत असताना देखील माझे व माझे पतीचे गावातील ओळखीचा ईसम नामे मन्मथ मारोती पंदिलवाड (जात भोई ) रा. आरळी बंगला ता. बिलोली याने व इंतर दि.07/07/2024 रोजीचे रात्री 09:00 वा घरुन नेउन माझे पतीस बिलोली कोटांच्या पाठीमागील तळ्याजवळ नेऊन अज्ञात कारणासाठी जिवे ठार मारुन त्याची बोंडी तळयात फेकुन दिलेली आहे. तरी माझे पतीस ठार मारणाऱ्या मन्मथ ला अटक करावी. अशी मागणी मृतकच्या पत्नीने केली आहे.