राजकिय

महाविकास आघाडीचे नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा केला भव्य दिव्य सत्कार

Spread the love

 

डीजे आणि फटाक्यांच्या आतिश बाजीत नव्याने निवडून आलेल्या खासदारांचे स्वागत.

चांदुर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी

लोकसभा निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या मविआच्या वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार अमर खाळे, अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे व जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांचा धामणगाव विधानसभा मविआ चे कडून सत्कार समारंभचे आयोजन शनिवार दिनांक 6 जुलैला चांदुर रेल्वे येथील वेरूळ रोड स्थिती यशवंत लॉन येथे सत्कार समारंभ ठेवण्यात आला. त्याआधी सिनेमा चौक शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला पुष्पमाला टाकून.शहराच्या मुख्य मार्गाने बाळासाहेब ठाकरे चौक, नगरपरिषद मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून. ही बाईक रॅली डीजे आणि फटाक्याच्याआतिशबाजी मद्ये
श्री राजर्षी शाहू सायन्स कॉलेज
मध्ये श्री राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरन करण्याकरिता पोहोचले. इथे प्रमुख अतिथी आणि नव्याने निवडून आलेले खासदार डॉ. कल्याण काळे, बळवंत वानखडे आणि अमर काळे यांच्या हाताने शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
धामणगाव विधानसभा क्षेत्राच्या चांदुर रेल्वे स्थित यशवंत लॉनमद्ये नव्याने निवडून आलेले खासदार बळवंत वानखडे, अमर काळे, डॉ. कल्याण काळे यांचा भव्य दिव्य सत्कार धामणगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी केला. यावेळी मंचावर काँग्रेसच्या तिवसा येथील आमदार यशोमती ठाकूर, जि.प.चे माजी अध्यक्ष बबलू देशमुख,कृ.उ.बाजार समितीचे सभापती जगदीश आरेकर, माजी जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाने, खरेदी विक्री संघ अध्यक्ष गोविंद देशमुख, माजी सभापती प्रभाकर वाघ, प्रवीण घुईखेडकर, धामणगाव जि.प.बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, पंकज वानखडे, बबन मांडवगडे, बेबी उईके सभापती सविता गावंडे, निशिकांत जाधव, सुधीर पाटील, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश राय तालुका अध्यक्ष विनोद काळमेघ, अशोक देशमुख, पांडुरंग डोंगरे, आप चे संयोजक नितीन गवळी, कॉ. देविदास राऊत, शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख, मनोज कडू, बंडू यादव, जनता दल डॉ. क्रांती सागर ढोले उपस्थित होते.
ह्या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक प्रा. वीरेंद्र जगताप यांनी केले. तर संचालन आणि आभार अभिजीत देशमुख यांनी केले. हा कार्यक्रम सफल होण्यासाठी युवा नेता परीक्षित जगताप, शिट्टी सूर्यवंशी, अमोल होले, निवास सूर्यवंशी, संदीप शेंडे, रुपेश पुडके, हर्षल वाघ, पंकज मेश्राम, सारंग देशमुख, सनी सावंत, सुमित सरदार, करण मेश्राम, सौरभ इटके, राहुल राऊत, सागर बोर्डे, सतीश देशमुख, प्रफुल कोकाटे, गीत माकोडे, अजय हाटे, राजु लांजेवार, विलास मोठघरे, सक्षम वानखडे, अनिल फरकाडे, रशीद भाई, संगपाल हरणे, दिनेश वाघाडे, गजानन चोरे, शरद घासले, आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ह्या सत्कार समारंभाला उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close