क्राइम

ज्या मृत बायकोसाठी खावा लागला पोलिसांचा मार ती झाली जिवंत घ्यायला शासकीय अनुदान 

Spread the love

भिंड (मध्यप्रदेश ) / नवप्रहार डेस्क 

              मध्यप्रदेश मधील भिंड जिल्ह्यातून एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. बायको चा मेउतदेह6 जळालेल्या अवस्थेत मिळाल्याने तिची हत्या नवऱ्यानेच  केलिब्या सबबीखाली त्याला अटक करून पोलिसांनी गुन्हा कबुल करावा यासाठी मारझोड केली होती. तीच पत्नी लाडली बहीण योजनेचे अनुदान काढल्याने जिवंत सापडली. त्यामुळे पोलीस प्रशासन संभ्रमित असून तो जळालेला मृतदेह कोणाचा याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

               उपलब्ध माहिती नुसार सुनील शर्मा याची बायको ज्योती ही कुटूंबाला न सांगता घरातून निघून गेली होती. सासर आणि माहेरच्या  मंडळीने तिचा खूप शोध घेतला. पण ती सापडून आली नाही. दरम्यान 4 मे रोजी कतरौल गावाजवळच्या शेतात एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला. सुनील यांना मृतदेह ज्योतीचा नसल्याचे वाटत होते, मात्र ज्योतीच्या माहेरच्या लोकांनी तो ज्योतीचाच असल्याचे ओळखले.

अंतिम संस्कार आणि नंतरची घटना-

पोस्टमार्टमनंतर आई-वडील आणि पोलिसांच्या दबावामुळे पती सुनील शर्मा यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. इतकेच नाही तर अस्थिकलश विसर्जन देखील केले. पत्नीच्या घरच्यांनी केलेल्या आरोपामुळे कारवाई करत पोलिसांनी सुनीलला पकडून बेदम मारहाण देखील केली, मात्र हा मृतदेह ज्योतीचाच आहे हे सत्य मानायला सुनील तयार नव्हता. सुनीलने सांगितले की, त्याने पत्नीची हत्या केली नाही आणि मृतदेह पत्नीचा नव्हता. दिवस सरत गेले आणि सुनील आणि त्याच्या कुटुंबावर पोलिसांचा दबाव वाढत गेला.

सुनील पोलिसांना टाळून दिवस काढत होता, अचानक एके दिवशी सुनील पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचला, तेव्हा त्याला समजले की ज्योतीच्या बँक खात्यातून 2700 चे व्यवहार झाले आहेत. ज्योती ‘लाडली बहना योजना’च्या पैसे काढताना नोएडामध्ये सापडली. नोएडा पोलिसांनी तिला पकडून मेहगावला नेले. आता पोलिसांसमोर प्रश्न आहे की जळालेला मृतदेह कोणाचा होता?

मध्य प्रदेशात महिलांना आर्थिक मदत देणारी ‘लाडली बहना योजना’ आहे. दरमहा 1250 रुपये देण्याची तरतूद आहे. ज्योतीने अंगठ्याचा ठसा देऊन रक्कम काढली. यानंतर ही बातमी पोलिसांपर्यंतही पोहोचली. सुनील पोलिसांसह नोएडाला पोहोचला, तेव्हा अचानक फूटपाथवर ज्योती तिची तुटलेली चप्पल दुरुस्त करताना दिसली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close