खेळ व क्रीडा
वेळेवर न उठल्याने त्याने गमावली संधी
ढाका / नवप्रहार इंटरनॅशनल डेस्क
वेळेचे महत्व काय असते हे शिक्षक लहान पणापासून आपल्याला समजवतात. पण ती वेळ वेळेचे गांभीर्य समजून घेण्याची नसल्याने आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही. अनेक वेळा आपण वेळेवर न पोहोचल्याने आपणाला शिक्षकांनी शिक्षा केल्याचे देखील काहींना आठवत असेल. पण जसजसे आपण मोठे होत जातो. आणि समाजात रुळायला लागतो तसतसे आपणाला वेळेचे महत्व समजायला लागते. तुम्ही जेव्हा देशाचे प्रतिनिधींत्व करता तेव्हा तर तुम्हाला याचे विशेष लक्ष। ठेवणे अगत्याचे आहे. वेळेवर न पोहोचल्याने एका आंतरराष्ट्रीय खेळाडूला मॅच खेळण्यास मुकावे लागले.
बांगलादेशचा उपकर्णधार तास्किन
अहमद भारताविरुद्धच्या सामन्यात
प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. त्याला
भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात
बाहेर बसवलं होतं. यामागचं कारण
आता समोर आलं आहे. तो बराच वेळ
झोपून राहिला आणि संघाच्या बसमध्येवेळेत पोहोचला नाही.
संघातून वगळण्याच्या कारणाबद्दल
वेगवान गोलंदाज तास्किन अहमदने
झोप हे कारण नसल्याचं सांगितलंय.
संघात आवश्यकतेनुसार बदल केल्यानं
माझा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश
नव्हता असं त्याने म्हटलं. २२ जूनला
अँटिग्वामध्ये झालेल्या सामन्यात <PREV
भारताने बांगलादेशला ५० धावांनी
हरवलं होतं. या सामन्यात बांगलादेशने
उपकर्णधार तास्किन अहमदच्या जागी
जाकिर अलीला घेतलं होतं.
बांगलादेशमधील एका वृत्तपत्राने
तास्किनच्या हवाल्याने म्हटलं होतं की,
तो मैदानात उशिरा पोहोचला होता. पण
नाणेफेक होण्याआधी तो मैदानात
उपस्थित होता. तास्किनने म्हटलं की, मी
नाणेफेक होण्याआधी ३० ते ४० मिनिटं
अगोदर मैदानात उपस्थित होतो.- मी
संघाच्या बसमध्ये वेळेत पोहचू शकलो
नाही. सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी
गाडी हॉटेलमधून निघाली आणि मी
मैदानावर जाण्यासाठी ८ वाजून ४३
मिनिटांनी रवाना झालो. मी बससोबतच
मैदानावर पोहोचलो. असं नाही की मला
उशिर झाला म्हणन संघात घेतलं नाही.
तसंही मी खेळणार नव्हतो असं
तास्किनने स्पष्ट केलं.-
तास्किनला त्यानंतर २४ जूनला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा संघात घेण्यात आलं. तास्किनने यासाठी माफी मागितली पण अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार शाकिब अल हसनने म्हटलं की उशिरा आल्याने या वेगवान गोलंदाजाला संघात घेणं कठीण झालं.