क्राइम

तो आला.. तिला गाठले आणि काही कळण्यापूर्वीच केले चाकूने सपासप वार

Spread the love

विरार ( मुंबई ) / नवप्रहार डेस्क

       मागील काही काळापासून कौटुंबिक कलहात कमालीची वाढ झाली आहे. पूर्वी कुटुंबात निपटणारे लहान मोठे वाद  आता पोलीस स्टेशन पर्यंत पोहचत आहे. आणि तेथून न्याय मिळण्यास उशीर होत असल्याने नवऱ्याचे पेशन्स संपत असल्याने त्यांच्या कडून गुन्हे घडत आहेत. कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोवर चाकूने सपासप वार करून ओढणीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे पोलिसांनी नवऱ्याला अटक केलीं आहे. तर जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पतीने गळ्यावर, हातावर चाकूने वार करून, ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विरार फलाट क्रमांक एकच्या ब्रिजवर सकाळी कामावर जाताना 7:30 वाजता ही घटना घडली आहे. घरातील कौटुंबिक वादातून हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवा शर्मा असे आरोपीचे नाव असून, वीरशिला शर्मा असे जखमी पत्नीचे नाव आहे. आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

विरारमध्ये आरती यादव प्रकरणाची पुनरावृत्ती

कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी काल पती-पत्नी विरार पोलीस ठाण्यात गेले होते. दोघांना समजावून सोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विरारमध्ये आरती यादव प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती दिसून आली. काही दिवसांपूर्वी वसईत भररस्त्यात अशाच प्रकारने एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून, गळा आवळण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी 7:30 वाजता विरार रेल्वे स्थानक फलाट क्रमांक एकच्या ब्रिजवरील घटना घडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close