सामाजिक

युपीएससी परीक्षेच्या निकालात अनुष्का लोहिया (खंडेलवाल) महाराष्ट्रात प्रथम तर देशात चौथी

Spread the love

 

वरुड/तुषार अकर्ते

वरुड शहरातील प्रतिष्ठीत किराणा व्यापारी अनिल खंडेलवाल यांची सुन तर अंबेजोगाई येथील सेवानिवृत्त प्राध्यापक अभिजीत लोहिया यांची मुलगी अनुष्का लोहिया, आनंद खंडेलवाल यांच्या पत्नी, हिने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस यु.पी.एस.सी परिक्षा २०२२ उत्तीर्ण करीत महाराष्ट्रातुन प्रथम तर देशातुन चौथ्या रँक मध्ये स्थान प्राप्त करीत यश संपादन केल्याने तिचे समाज बांधवांसह सर्वच क्षेत्रातुन अभिनंदन केल्या जात आहे.
प्राप्त माहीती नुसार बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई येथील सेवानिवृत्त प्राध्यापक अभिजीत लोहिया आणि एम.डी. मेडिसिन डॉ.शुभदा राठी लोहिया यांची मुलगी तथा वरुड शहरातील प्रतिष्ठीत किराणा व्यापारी अनिल व अनिता खंडेलवाल यांची सुन अनुष्का हिचा जन्म ११ मे १९९४ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाला. सन. २०१६ पासुन तिने यु.पी.एस.सी करीता तैय्यारी सुरु केली होती. १९ डिसेंबर २०२२ मध्ये तिचा शुभविवाह अमरावती जिल्ह्याच्या वरुड येथील आनंद अनिल खंडेलवाल यांचे सोबत पार पडला. अनुष्का हिचे प्राथमिक शिक्षण योगेश्वरी प्राथमिक शाळा अंबेजोगाई, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळा अंबेजोगाई, महाविद्यालयीन शिक्षण दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर तर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे येथुन तिने पदवी शिक्षण घेतले, यानंतर ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परिक्षा केन्द्र पुणे येथुन तिने स्पर्धा परिक्षेची तैय्यारी सुरु केली आणी अनुष्का हिने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस यु.पी.एस.सी परिक्षा २०२२ उत्तीर्ण करीत महाराष्ट्रातुन प्रथम तर देशातुन चौथ्या रँक मध्ये स्थान प्राप्त करीत यश संपादन केले. ती आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, पती, सासु, सासरे तसेच सर्व कुटुंबीयांसह ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परिक्षा केन्द्र पुणे चे व्यवस्थापक विवेक कुलकर्णी, तेलंगणा येथे कार्यरत आय.पी.एस अधिकारी महेश भागवत, मध्यप्रदेशातील इंडियन फॉरेस्ट अधिकारी अनुपम शर्मा, महाराष्ट्रातील इंडियन फॉरेस्ट अधिकारी पियुषा जगताप इत्यादींना देत आहे. आपल्या अथक परिश्रमाने यशाचे उंच शिखर गाठलेल्या अनुष्का हिचे समाज बांधवांसह सर्वच क्षेत्रातुन अभिनंदन केल्याजात आहे.

*मला निर्सग व पर्यटनची आवड*

अनुष्का लोहिया (खंडेलवाल) हिने बी.इ (सिव्हील) ही परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण करुन आपले लक्ष यु.पी.एस.सी परीक्षेकडे वळविले. आणी पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी अभ्यासिकेत तीने अभ्यास केला. शास्त्रीय नृत्य, चित्रकला, फोटोग्राफी हे निसर्ग छंद जोपासत तीने वन परिक्षेत्रात आपले करियर निवडले. आणी यु.पी.एस.सी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंडियन फॉरेस्ट सव्हिसेस मध्ये करीयर करायचे निश्चित करुन परी‌क्षेची जोरदार तयारी केली. आणी महाराष्ट्रातुन प्रथम तर देशातुन चौथ्या रँक मध्ये तिन स्थान प्राप्त केले. शालेय जीवनापासूनच तिला अभ्यासासोबत शास्त्रीय नृत्य, फोटोग्राफी, चित्रकला, पक्षी निरीक्षण, निसर्ग प्रेम, पर्यटन क्षेत्र आदिंची आवड असल्याने या छंदाच्या माध्यमातुन तिने दिग्दर्शित केलेल्या Too little too late या शॉर्ट फिल्म ला आंतरराष्ट्रीय नामांकन सुद्धा मिळाल्याचे अनुष्काने माध्यमांशी बोलतांना सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close