वाण धरणाचे पाणी बाळापूर तालुक्याला जाऊ देनार नाही
तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार*
वाण प्रकल्प पाणी बचाव संघर्ष समितीचा पुढाकार..!*
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड :- तेल्हारा तालुक्यासाठी संजीवनी असलेल्या वारी येथील वान धरणाचे पाणी आता कुठेही जाऊ देणार नसल्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी निर्धार केला असून याबाबत वान प्रकल्प पाणी बचाव संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे व याबाबत हिवरखेड येथे दिनांक 29 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वान धरण निर्मितीच्या वेळेस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती या प्रकल्पामध्ये गेल्या मात्र या वाण प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतीच्या सिंचनाच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता होता आणि म्हणून या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा हसत हसत आपल्या जमिनी दिल्या या प्रकल्पासाठी दिल्या मात्र कालांतराने पिण्याच्या पाण्याची टंचाई अकोला व बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भासत असल्यामुळे या वाण प्रकल्पाचे पाण्यावर 84 खेळी योजनेसह संग्रामपूर, जळगाव,शेगाव तसेच अकोला जिल्ह्यातील अनेक गावांना वानप्रकल्पाचे पाणी देण्यात आले त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाला पाणी मिळणे अवघड झाले . मात्र आता बाळापुर तालुक्यासाठी सुद्धा वान धरणाचे पाणी नेण्याचा डाव आखल्या गेला असून त्यावर काम सुद्धा सुरू झाले आहे प्रत्यक्षात बाळापुर साठी लागणारे पाणी हे बाळापुर लगतच असलेल्या कवठा मॅरेज मधून घेता येऊ शकते मात्र तरीही 100 ते 110 किलोमीटर वर पाणी नेण्याचा हट्ट का असा प्रश्न तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वान धरणाचे पाणी इतरत्र न जाण्यासाठी आमदार भारसाकळे यांनी प्रयत्न करून बाळापुर तालुक्याला जाणाऱ्या पाण्याच्या कामावर स्थगिती आणली होती मात्र महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर या कामावरील तात्काळ स्थगिती उठविण्यात आली. आता जी गाव प्रकल्पातून अकोल्याला पाणी आरक्षित केल्या गेले असून बाळापूर साठी सुद्धा वाण प्रलकल्पातून पाणी न घेता कवठा बॅरेज मधून पाण्याची सोय करावी अशी मागणी वान प्रकल्प पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार पेठ हिवरखेड येथे पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुठेही जाऊ देणार नसल्याचा संकल्प शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी संघर्ष समितीच्या वतीने उमेश पवार, राजू रावणकार, सुनील इंगळे, गुरु पाटील कोरडे, डॉक्टर विखे, अनिल कराळे, रमेश दुतोंडे बंडू पाटील ढाकरे यांच्यासह पत्रकार व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.