पुलगाव येथे अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई
एसडीपीओ यांची मागील सात दिवसात तिसरी मोठी कारवाई
दहा ट्रक जप्त करीत 22 जणांना करण्यात आली अटक
वर्धा / आशिष इझनकर
मागील काही दिवसांपासून सालफळ येथील डेपो वर सुरु असलेल्याया अवैध कारभारा बाबत माहिती मिळताच आयपीएस अधिकारी असलेले आणि सध्या एसडीपीओ चा पदभार सांभाळत असलेले राहुल चव्हाण यांनी रात्री ताफ्यासह कारवाई करत 10 ट्रक, जेसीपी सह 22 लोकांना ताब्यात घेतले आहे.
वर्ध्याच्या पुलगाव येथे अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करीत तब्बल 22 जणांना पुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. सालफळ येथील रेती डेपोवर रात्री दरम्यान अवैध रेती भरलेले दहा ट्रक रेती वाहून नेत असताना जप्त करण्यात आले आहे. तर सोबत चार कार आणि एक जेसीबी देखील या मोठ्या कारवाईत सापडला आहेय. रात्रीमध्ये रेती वाहून नेण्यास बंदी असताना अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याने कारवाई करण्यात आलीय. आय पी एस अधिकारी राहुल चव्हाण यांच्याकडे डी वाय एस पी चा पदभार आहे, चव्हाण यांनी रात्री दोन वजताच्या दरम्यान पुलगाव पोलीस, वर्धा एस पी पथकाने धाड टाकत अवैध रेती वाहून नेणारे ट्रक जप्त केले, ट्रकच्या मालकांसह चालक असे 22 जणांना अटक करण्यात आली. गेल्या सात दिवसातील ही तिसरी मोठी कारवाई आहेय. सेवाग्राम आणि देवळी येथे देखील रेती भरून असलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.
वाळू माफियांचे धाबे दणाणले – या कारवाई नंतर वाळू माफियांच्या तंबूत घबराहट पसरली आहे.पुलगाव आणि परिसरातील वाळू माफिया कोणाला जाणत नसल्याचे मागील अनेक प्रकरणावरून समोर आले आहे. अधिकाऱ्यांना आम्ही खिशात घेऊन फिरतो असे ते नेहमीच बोलतात.
महसूल अधिकाऱ्यांना देखील आरोपी करण्याची मागणी – वाळू घाटावर आणि डेपोवर चालणारा अवैध कारभार हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्या शिवाय शक्य नाही. महसूल बिभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचे कथित अभय असल्यानेच हा सगळा गोरखधंदा बिनबोभाट सुरू आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांना सुद्धा या प्रकरणात आरोपी करावे अशी जनतेची मागणी आहे.