अल्पसंख्यांक समूहाला अधिकार द्यायचे, यासाठी त्यांना अजितदादा च्या राष्ट्रवादी सोबत घ्या सलीम सारंग
मुंबई / प्रतिनिधी
वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या मार्गदर्शनात आर्वी विधानसभा अध्यक्ष *दिलीप पोटफोडे व शिष्टमंडळा ची मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नावर मुंबई त बैठक*
दिनांक : 27//6/2024 ला वर्धा जिल्हाध्यक्ष शरद भाऊ शहारे यांच्या मार्गदर्शनात आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे व शिष्टमंडळाची मुबंई येथील महाराष्ट्र राज्याचे मुस्लिम समाजाचे युवा नेता तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुस्लिम समाजाला 5% टक्के आरक्षण दिल पाहिजे यां साठी ज्यांची चळवळ महाराष्ट्र भर चालु आहे, असे सलीम सारंग यांच्या मुंबई येथील सिउड्स कार्यालयात बैठक पार पडली यावेळी मुस्लिम समाजाच्या उन्नती साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री हे सकारात्मक असून मुस्लिम समूहाला 5% आरक्षण मिळाल पाहिजे यां मताचे आहेत, अशी चर्चा झाली, यावेळी, वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे व आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी वर्धा जिल्ह्यात मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ च कार्यालय बंद असल्यामुळे राज्य व केंद्र सरकार द्वारा मुस्लिम समाजासोबत च शिख जैन बोहरा नवंबौद्ध यांना प्रवाहात आणणारा प्रमुख मार्ग बंद असल्यामुळे मागील दहा वर्षात अल्पसंख्यांक समाजावर झालेला हा, आर्थिक, शैक्षणिक, आणि औद्योगिक क्षेत्रात कमकुवत ठेवण्यासाठी झालेला अप्रत्यक्ष अन्यायच असल्याची संतप्त भावना विशद करण्यात आली तसेच 2014 च्या तत्कालीन सरकार नी मुस्लिम समाजाला 5 % टक्के आरक्षण देण्याचा निर्णय प्रत्यक्षात आणावा हि चर्चा यां बैठकीत झाली, यां विषयावर राज्य स्तर व वरिष्ठ स्तरावर सुद्धा नियोजन बद्ध तय्यारी करण्याच ठरल असून वर्धा जिल्ह्यात लगेच नुक्कड सभा ते प्रमुख लोकांच्या भेटी घेत त्यांचा अहवाल पार्टी ला देण्याचं एकमताने ठरल तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सर्व मंत्री गण व आमदाराना सदरील प्रस्ताव विधानसभा च्या सभागृहात आणण्यासाठी लवकरच पुन्हा मुबंई ला तातडीची बैठक घेणार आहे यावेळी, बैठकीला जिल्हा सचिव गजानन लाखे, संदीप सोनटके,व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते