सामाजिक

राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त ” ज्ञान नर्मदा ” द्वारा वृक्षारोपण

Spread the love

अनिल डाहेलकर / मूर्तिजापूर

मुर्तीजापुर : येथील समाजकार्यात अग्रेसर ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित हॅपी वुमन्स क्लब च्या अध्यक्ष सुनीता लोडम यांच्या पुढाकाराने प्रतिभावंत नगर विघ्नहर्ता गणपती मंदिर येथे राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज प्रतिमेला हार अर्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराजांचे लोकाभिमुख समाजकार्य व शैक्षणिक धोरण या विषयावर सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम यांनी विचार व्यक्त केले .
तसेच वातावरणाचा समतोल राखण्याकरिता प्रत्येकाने झाडे लावून ते जगण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे . व ती आपली नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे जागरूक नागरिकांनी प्रत्येकाने एक तरी वृक्षाची जोपासना करावी असे आवाहन करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येत असतो अशी माहिती देण्यात आली यावर्षी एकशे एक झाडे लावण्याचा उपस्थित महिलांनी संकल्प केला.
यावेळी प्रामुख्याने कल्पना तिडके, डॉ,स्वाती पोटे ,सुनीता लोडम, रूपाली तिडके, वनिता पाथरे , रजनी भिंगारे, माया दवंडे, दिग्विजय ढोकणे, अतुल गावंडे, विष्णू लोडम उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता हॅपी वुमन्स क्लबच्या महिलांनी परिश्रम घेतले .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close