चहापान संवादाचे साधन
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
मुख्यमंत्र्यांनी चहापानाला आवर्जून बोलावलं होतं. चहापानाला बहिष्कार टाकायचा आणि नंतर सभागृहात सरकारी बिलांना पाठिंबा, असं मी करत नाही. जनविरोधी बिलांच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. लोकशाहीमध्ये अधिवेशना अगोदरचं जे चहापान असतं ते चर्चेसाठीचं, संवादाचं उत्तम साधन असतं, अशी माझी भूमिका आहे. पण जेव्हा जेव्हा विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला तेव्हा मी सोबत राहिलो. विधान परिषद सदस्य म्हणून माझं हे शेवटचं अधिवेशन आहे. अशावेळी सौजन्य म्हणून मुख्यमंत्री यांचं चहापानाचं आमंत्रण मी स्वीकारलं.अशी माहिती आमदार कपिल पाटील यांनी दिली. पदवीधर शिक्षक मतदार संघाचे आमदार म्हणून गेली अठरा वर्षे प्रतिनिधीत्व केलेल्या आमदारांनी विधान परिषदेतून निवृत्ती स्वीकारुन एक नवा आदर्श निर्माण केला अशी प्रतिक्रिया वरीष्ठ क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल सरांनी व्यक्त केली.
समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांच्या पक्षाचे बोधचिन्ह व पक्षाची घोषणा स्वतः उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आणि या प्रसंगी शिवसेना पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अनिल परब व नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. आजच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव, माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनीही विशेष शुभेच्छा दिल्या आमदार अनिल परब व कपिल पाटील सभागृहात सलोख्याचे नाते ठेवून असतात अशातच आज पार पडलेल्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे व उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांच्यातील निकाल काय लागतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह आपल्या सभागृहातील सदस्यांसह कपिल पाटील यांनी चहापानाला उपस्थीती लावून पुन्हा सभागृहात येण्याची चर्चा तर केली नाही ना? कारण लवकरच विधान परिषद निवडणुक होणार आहे. समाजवादी गणराज्य पार्टी’ची दमदार सुरुवात होईल असा विश्वासही आमदार कपिल पाटील यांचा कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केला.