क्राइम
धारणी पोलिसांवर चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याचा होत आहे आरोप

जुगारातील मुख्य आरोपीला कथित रित्या सोडल्याचा आरोप
धारणी / प्रतिनिधी
धारणीतील शासकीय विभाग आणि प्रशासन नेहमीच चर्चेत असतात.त्यातल्या त्यात पोलीस विभाग तर या सर्वांच्या एक पाऊल पुढे आहे असे म्हटल्या जाते . आणि हे सिध्द करणारी घटना नुकतीच उदयास आली आहे.
जनतेत सुरू असलेल्या आणि या प्रकारणातील काही आरोपींनी मीडियात दिलेल्या बयाना नंतर येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकुन 29 आरोपींना अटक केली होती.पण ठाण्यात येतायेता 28 आरोपीच ठाण्यात पोहचले .या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी मधातच गायब केल्याची चर्चा आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार धारणी पोलिसांनी हरीसाल येथील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली.यावेळी जुगार खेळणाऱ्या 29 आरोपींना पोलिसांनी अटक केली.मुख्य म्हणजे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि जुगार अड्ड्याचा मालक सलीम कदर कटारे याला देखील पोलिसांनी अटक केली होती . पण पोलिसांचे ‘ आर्थिक ‘ ध्यान राखणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी वाटेतच सोडून दिल्याचे इतर आरोपींचे म्हणणे आहे.अटक केलेल्या इतर जुगाऱ्यांना देखील जमानती वर सोडण्यात आले .
मुख्य सुत्रधाराला मिळालेल्या विशेष ट्रीटमेंट मुळे इतर आरोपी नाराज – पोलिसांनी ज्या लोकांवर जुगार ऍक्ट नुसार कारवाई केली त्या लोकांपैकी काही लोकांचे असे म्हणणे आहे की आम्ही जुगाराचा गेम पाहत उभे असतांना देखील आम्हाला आरोपी बनविण्यात आले.
पोलिसांनी जागेवर सोडण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप – या प्रकरणातील आरोपी हिरुजी गायन यांनी पोलिसांवर पैशे मागीतक्याचा कथित आरोप केला आहे. त्यांच्या नुसार त्यांना या प्रकरणात पकडल्यावर त्यांना जागेवर सोडुन देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1