उरुळी कांचन येथे मधुमेह जनजागृति कार्यक्रम
वृतसंकलन : अनिल डाहेलकर
उरुळीकांचन – येथील कस्तुरबा मातृ मंडळ व महात्मा गांधी सर्वोदय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. मदन फडणीस तज्ञ मधुमेह यांचे ‘मधुमेह आणि दैनंदिन जीवन’ या विषयावर उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात व्याख्यान आयोजित केले होते. डॉक्टरांनी मधुमेह झाल्यावर व होऊ नये म्हणून खूप सोप्या शब्दात उदाहरणे देऊन समजून सांगितले. डॉक्टरांनी आहार विषयी माहिती व्यायाम दिनचर्या व औषधे व्यवस्थापन कसे करावे हे समजून सांगितले महत्त्वाचे म्हणजे मधुमेहाविषयी जे गैरसमज आहेत ते डॉक्टरांनी खूप सोप्या शब्दात समजून सांगितले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्रामध्ये महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा.के.डी कांचन, देविदास भन्साळी, सोपान कांचन, राजाराम कांचन, महादेव कांचन, संभाजी कांचन, राजेंद्र कांचन, जे.बी.सराफ, भालके, वामन कांचन, रामदास चौधरी, दत्तोबा कांचन, जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे, प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य गो.ग.जाधव, पर्यवेक्षक विलास काशीद, शिवाजी कांचन, विजय तुपे, अमोल भोसले ग्रामस्थ आदी जेष्ठ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कस्तुरबा मातृ मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा भन्साळी यांनी केले. सूत्रसंचालन संगीता भालके व आभार प्रदर्शन अंजली कुलकर्णी यांनी केले.