राजकिय

फडणवीस यांचे नाव जाहिरात फलकावरून वगळल्याने भाजपा तालुका अध्यक्षांकडून आ. भोंडेकर यांचा निषेध 

Spread the love

 

नवप्रहार भंडारा प्रतिनिधी /  हंसराज

भाजप चे विनोद बांते ( भंडारा तालुका अध्यक्ष ) यांनी शिवसेनेचे सिंदे गट आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर नाराजी चा सुर आपल्या एका पत्राद्वारे व्यक्त केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी २४ जून रोजी भंडारा येथे ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करिता आले असता भूमिपूजनाच्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्र्याच्या विभागाच्या मंजूर निधीतून भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले.महायुती शासनाचा शासकीय कार्यक्रम असून या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे च्या समोर दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे बॅनरवर नाव व फोटो क्रमपात असणे आवश्यक्य होते. खासकरून जलसंपदा मंत्री मन्हून देवेंद्र फडणवीस फोटो असणे आवश्यक्य होते. कारण हा निधी देवेंद्र फडणवीसानी आणला आहे. जाणीव पूर्वक उदघाटन फलकावरती नाव वगळण्यात आले आणि ही चूक म्हणता येणार नाही. हा अपमान जाणीवपूर्वक पूर्व नियोजनाने केला आहे. जिल्हाधिकारी व आमदार भारतीय जनता पक्ष तालुका वतीने तालुकाध्यक्ष म्हणून मी निषेध करतो.
त्यामुळे महायुतीच्या भावना दुरावल्या गेल्या. भारतीय जनता पक्ष यांचा अपमान वारंवार होत आहे. आणि लोकसभेत सुद्धा युतीच्या नेत्यांनी आम्हाला कोणतीही मदत केलेली नाही. सोबतच युती धर्म पाळलेला नाही. त्यामुळे आमच्या उमेदवाराच्या थोडास्या फरकाने पराभव झाला.

नरेंद्र भोंडेकर आमदाराणी विनोद बांते यांच्यावर व्यक्तिगत टीका केली. त्यामुळे विनोद बांते नी भोंडेकरांच्या निषेध एका पत्राद्वारे केला आहे. कालच्या या प्रकारामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये
भ्रम निर्माण झालेला आहे. आम्ही महायुती धर्म पाळणारे कार्यकर्ते असून महायुतीच्या धर्माच्या पालन करू. सध्या महायुती मध्ये तापमान वाढलेला दिसत आहे दरार पडल्याचे पद चिन्ह दिसत आहेत.
आता येणाऱ्या चुनावामध्ये ही महायुती राहणार का ?
आता हे बघण्यासारखे आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close