मंगरूळ पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे वाहन पकडले
९ गोवंशाची सुटका
धामणगाव रेल्वे / हितेश गोरिया
पोलीस स्टेशन मंगरुळ दस्तगीर पोलीसांनी बोलेरो पिकअप क्र. एम एच ४३ एडी ९३१७ चा चालक निजामोदिन अलिमोदिन वय ३४ वर्ष रा पठाणपुरा, मुर्तिजापुर जि. आकोला दि. १५/०७/२०२३ रोजी पुलगाव येथुन आकोला कडे जाणा-या हायवे रोडने वाहतुक करीत आहे. अशी गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने ठाणेदार पंकज दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टॉपसह ग्राम बोरगाव धांदे जवळ नाकाबंदी केली असता ताळपत्री बांधलेल्या बोलेरो पिकअप एम एच ४३ एडी ९३१७ वर संशय आल्याने सदर वाहनाला चेक केले असता बोलेरो पिकअप मध्ये भारत सरकारने प्रतिबंधित केलेले ०९ गोवंशिय जनावरे दिसुन आली. . गुरांनी भरडलेल्या बोलेरो पिकअप चालकाची चौकशी केली असता त्याला उत्तर देता आले नाही. त्यावरून पोलिसांनी चालक निजामोदिन अलिमोदिन याला अटक करून वाहन ताब्यात घेतले व सदर जनावरे पोलिस स्टॉप व गोशाळा स्टॉप यांचे मदतीने श्री गोवरक्षक संस्था धामणगाव रेल्वे र. नं. एफ १५१ मध्ये जनावरांचे सुरक्षितता व देखभालीच्या दृष्टिने ठेवण्यात आले आहे. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन मंगरुळ दस्तगीर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयात अधिक आरोपी निष्पन्न करण्याचे दृष्टिने पुढील तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण श्री अविनाश बारगड, मा अपर पोलीस अधिक्षक श्री शशीकांत सातव, मा उपविभागिय पोलीस अधिकारी उपविभाग अमरावती ग्रामीण, मा उपविभागिय पोलीस अधिकारी उपविभाग चांदुर रेल्वे अतिरीक्त पदभार उपविभाग मोर्शी डॉ श्री निलेश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो स्टे मंगरुळ दस्तगीर सपोनि पंकज दाभाडे. चालक नापोका सुनिल उडाखे, पोकों सतिश ठवकर, पोकों मोहसिन शहा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
जिल्ह्यातील गोवंश तस्करीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहे असे दिसुन येते. काही दिवसा पुर्वी २० बैल व काहि गोरे अवैध वाहतूक करणारा ट्रक मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी पकडला आणि आता परत आनखी दि. १५/०७/२०२३ रोजी अवैध जनावरची वाहतुक करनारे बोलेरो पिकअप यात ०९ जनावरे, वाहन व वाहन चालक मंगरुळ दस्तगीर पोलीसांनी पकडले यावरून असे लक्षात येते कि जिल्हात मोठ्या प्रमाणात गो तस्करी होते आहे. प्रशासनाने गो -तस्करी थांबवण्या करिता एक वेगळे पथक नेमायला हवे ज्यामुळे गो- तस्करी ला आळा बसेल अशी मागणी राष्ट्रीय गोरक्ष मंचावतीने होत आहे.