Uncategorized
मधधुंद तरुण इसमावर करत होता दगडाने वार मुकदर्शक बनून पाहत राहिली जनता
वर्धा / नवप्रहार डेस्क
एकीकडे आपण एकमेकांच्या कामी पडलो पाहिजे अशी शिकवण आपल्याला दिली जाते . तर दुसरीकडे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असे म्हटल्या जाते. परंतु या सगळ्या गोष्टी बोलण्यात आणि ऐकण्यात चांगल्या वाटतात. प्रत्यक्षात मात्र त्या अंगिकरल्या जात नाहीत. दया, माया, मानवता लोप पावत असल्याचा प्रत्यय नुकताच वर्धा जिल्ह्यातील देवळी- सोनेगाव मार्गावर घडला. मधधुंद तरुण एका इसमाला दगडाने ठेचत होता. तर उपस्थित या घटनेचा व्हिडीओ बनवत होते. त्याला अडवण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही.
देवळीलगत सोनेगाव मार्गावर पोलीस वसाहती समोर ही निंदाजनक व क्रूर घटना घडली आहे. सोनेगाव आबाजी येथील विनोद डोमा भरणे (४५) हा काही कामासाठी देवळी येथे आला होता. काम आटोपून गावी परत जाण्यासाठी तो पोलीस वसाहत असलेल्या चौकात ऑटोची वाट बघत थांबला. तेव्हाच तिथे करण मोहिते या विस वर्षीय युवक येऊन धडकला. तो दारूच्या नशेतच होता. त्याने विनोदकडे पैश्याची मागणी केली. करण यास दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी गावातील कुणालाही पैसे मागत असे. त्याची ही सवय माहित असल्याने विनोदने पैसे देण्यास नकार दिला.
दोघात वाद झाला. यात पडते घेत विनोद हा कसाबसा बाहेर पडला. तेव्हा करण याने मोठा दगड विनोदच्या डोक्यात हाणला. तो खाली पडल्यावर परत त्याच दगडाने त्याला वारंवार ठेचणे सूरू ठेवले. असा प्राणघातक वार झाल्याने विनोदचा जागेवरच मृत्यू झाला. जाहीरपणे असा निर्घृण खून करण्यात आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली. या मारहाणीत जवळच उभी मीरा शालिक मून या महिलेसपण दगड लागल्याने ती जखमी झाली. तर हा घृणास्पद व क्रूर प्रकार पाहून सुनीता वसंत ठाकरे ही महिला जागेवरच बेशुद्ध पडली. तिला त्वरित आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.
दारुबाज युवकाने केलेला हा प्रकार लोकांना धस्तावून गेला आहे. पण घटना घडत असताना अनेक बघे निमूट उभे होते. एकही मदतीस धावला नाही. उलट काहींनी या घटनेचे चित्रीकरण करीत व्हिडिओ व्हायरल केले. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. दारूबंदी असलेल्या व गांधी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेने दारूबंदीचे सत्य पुढे आले आहे. या थरारक घटनेची माहिती मिळताच देवळी पोलीस घटनास्थळी पोहचले. खूनी करण यास ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, माहिती मिळताच मृतक विनोद यांची पत्नी अर्चना भरणे ही पण घटनास्थळी धावत आली. हे दृष्य पाहून तिला पण भोवळ आली. या घटनेने जिल्ह्यातील दारूबंदी परत चर्चेत आली असून अशा घटनांवार अंकुश बसावा, अशी मागणी होत आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |