क्राइम

चोरांनी एटीएम मशीन पळवली, पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत रोकड आणली परत 

Spread the love

बीड / नवप्रहार डेस्क 

                 जीह्यातील धारूर येथील एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी पिकअप च्या मदतीने पळवून नेली. ही बाब पोलीस आणि बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षग आल्यावर पोलिसांनी 4 तासात 61 किमी चोरांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करत त्यातील 21 लाख 13 हजार 700 रुपयांची रोकडही परत आणली आहे. चोरटे मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.

ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेची माहिती बँक कर्मचारी आणि पोलिसांना समजताच त्यांनी अवघ्या 4 तासांमध्ये 61 किलोमीटरच्या पाठलागानंतर या प्रकरणाचा छडा लावत 21 लाख 13 हजार 700 रुपयांची रोकडही परत आणली आहे.

4 तासांमध्ये 61 किमी पाठलाग
बीडच्या धारूर येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन 4 चोरांनी अवघ्या 2 मिनिटात काढत पिकअपला बांधून पळवल्याची घटना काल (शनिवारी) घडली होती. ही माहिती बँक कर्मचारी व पोलिसांना समजताच 4 तासांमध्ये 61 किलोमीटरच्या पाठलागानंतर गेवराईतील जायकोवाडी शिवारात सकाळी 8.30 वा ही मशीन पत्र्याच्या शेडमध्ये सापडली. मशीनमधील संपूर्ण रक्कम परत आणली गेली आहे. धारूरचे पोलिस निरीक्षक देविदास वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई केली. या प्रकरणातील चारही आरोपी फरार असून त्यांचा तपास धारूर पोलीस करत आहे. विशेष म्हणजे या मशीनमधील 21 लाख 13 हजार 700 ची रोकड परत आणली गेली आहे. लवकरात लवकर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close