हटके

अन… त्यांनी स्मशानातच उरकवले लग्न

Spread the love
काहीही … असं कधी व्हतंय व्हय ? 

जिथे आयुष्याचा शेवट तेथूनच जीवनाची सुरवात 

राहता / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

मनुष्य जन्माचा शेवट हे त्रिकालाबाधित सत्य आहे.म्हणजे जन्माला आलेल्या व्यक्तीचा मृत्यू हा निश्चिग आहे.फक्त त्याची वेळ आणि जागा हा विश्वनिर्माता म्हणजे परमेश्वर निश्चित करत असतो. आणि प्रत्येक व्यक्तीला शेवटचा निरोप हा स्मशानात दिला जातो.पण राहता येथील एका नवदाम्पत्याने  आपल्या सहजीवनाची सुरवात स्मशान भूमीतून केली आहे. पंचक्रोशीत या लग्नाची चर्चा होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहता स्मशानभूमीत हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. स्मशानभूमीत गेल्या 20 वर्षापासून काम करणारे गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानभूमीतच लावला.

स्मशानभूमीला अनेकजण अशुभ मानतात, मात्र याच स्मशानभूमीत विवाहाचे सर्व संस्कार पार पडले. अगदी थाटामाटात दोघांचा विवाह लावण्यात आला. विषेश म्हणजे जातीपातीची बंधने झुगारून सुशिक्षित तरूणाने म्हसनजोगी समाजातील मुलीशी विवाह करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

मनोज जयस्वाल आणी मयुरी गायकवाड यांच्या विवाहासाठी शहरातील मान्यवरही उपस्थित होते, त्यांनी नवविवाहित जोडप्याला भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पिपाडा दामपत्यानेही कन्यादान करत मुलीला संसार उपयोगी भांडी भेट दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close