मुंबई मराठी पत्रकार संघाचा 83 वा वर्धापन दिन उस्ताहात साजरा…
मुंबई / अकबर खान
मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघाचा 83 वा वर्धापन दिन आज दिनांक 21 जुन 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 65 वर्ष पूर्ण केलेल्या सभासदांना तसेंच जेष्ठ पत्रकारांना सन्मानीय सभासत्व व सहसभासत्व प्रदान करण्यात आले. यावेळी विशेष सदस्यत्व दैनिक महासागर चे संपादक श्रीकृष्णं चांडक,विशेष सदस्यत्व नवी मुंबईचे लोकप्रिय आमदार श्री. रामशेठ ठाकूर,पंकज. अरुण कुमार मुडला,ऍड. राजेंद्र बळी, यांना पत्रकार संघाचे विशेष सदस्यत्व प्रदान करण्यात आले. शोध पत्रकारितेतील पुरस्कार पुढारीचे पंकज दळवी,प्रमोद तेंडुलकर,सामाजिक बांधीलकी व जेष्ठ पत्रकार विशेष पुरस्कार विजयकुमार बांदल,छायाचित्रकार संतोष बने,लता राजे, जोगळेकर,विशेष पुरस्कार, सुहास जोशी, वैजयंती कुलकर्णी,पुढारीचे संपादक प्रतापसिह जाधव यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी रामदास फुटाणे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमास मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,कार्यवाह संदीप चव्हण,संयुक्त कार्यवाह विष्णू सोनावणे, कोषाध्यक्ष जगदीश भुवड,उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर्,उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के,सदस्य दिवाकर शेजवळ,राजेंद्र हुंजे,आत्माराम नाटेकर, गजानन सावंत, राजीव कुलकर्णी,तसेंच पत्रकार संघाचे सदस्य व सर्व आजी माजी अध्यक्ष,पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.