क्राइम

तुरुंगातून बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराचा खून 

Spread the love

नगर सेवकाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात होता बंद 

ज्या नगर सेवकाच्या हत्येच्या कटात भोगली शिक्षा त्यालाच केली अटक

पिंपरी / नवप्रहार डेस्क

            हत्येचा कट रचल्याच्या आरोपात शिक्षा झालेल्या आणि तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीचा खून करण्यात आला आहे. घटना पुनावळे येथील आहे. ज्या राष्ट्रवादी च्या नगर सेवकाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोप या गुन्हेगारावर होता त्या नगर सेवकाला या प्रलरणात आरोपी करण्यात आले आहे. अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (३५, रा. पुनावळे गावठाण), असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे.. एक महिन्यांपूर्वीच तो बाहेर आला होता. दरम्यान, पोलिसांनी आता संबंधित माजी नगरसेवकाला सराईताच्या खून प्रकरणी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवकाला अटक

सूरज मुरलीधर गाडे (रा. गहूंजे), हा देखील या हल्ल्यात जखमी झाला आहे. पोलिसांनी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ याला अटक केली आहे. तर, इतर नऊजण फरार झाले आहेत. याप्रकरणी समीर गोरगले (वय ३३) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कसा झाला हल्ला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरगले त्याच्या मित्रासोबत पुनावळे येथील समाधान हॉटेलच्या मागील बाजूस बसला होता. त्यावेळी आरोपींनी गोरगले याच्यावर हल्ला चढवला. यामध्ये डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

नगरसेवकाच्या हत्याचा कट

मागील वर्षी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गोरगले याच्यासह इतर दोघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले होते. त्यांच्याकडून पिस्तूल व जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली होती. पोटनिवडणुकीत झालेल्या वादातून खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, यामागे इतर काहीतरी कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रावेत पोलिस तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close