खासदारांनी कुलूप तोडून घेतला कार्यालयाचा ताबा
# अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना सुनावले खडेबोल.
**चांदुर रेल्वे (ता. प्र) प्रकाश रंगारी*
अमरावती: येथील जिल्हाधिकार्यालय परिसरातील खासदारांच्या कुल्फ बंद कार्यालयाचा ताबा मिळावा, यासाठी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे त्यांनी कार्यालयाचा ताबा मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे सातत्याने पाठपुरवठा केला. परंतु 17 दिवसानंतरही प्रशासनाद्वारे चाबी देण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले व लगेचच कुलूप फोडून कार्यालयाचा ताबा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत जिल्ह्याच्या खासदारासाठी एक कार्यालय तयार करण्यात आलेले आहे. आचारसंहितेच्या काळात जिल्हा प्रशासनाने हे कार्यालय नवनीत राणा यांच्याकडून ताब्यात घेऊन त्याला कुलूप लावले होते. दरम्यान लोकसभा निवडणूक प्रक्रिया आटोपली, व महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे विजयी झाले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी या कार्यालयाची मागणी जिल्हाधिकारी सौरव कटियार यांच्याकडे केली.
त्यानंतर वानखडे यांच्याद्वारे सातत्याने जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असतांना नियोजन विभागाने या कार्यालयाची चाबी वानखडे यांना दिली नाही. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले. पालकमंत्री येण्यापूर्वी एक दिवसाआधी सुद्धा चाबी मागितली. मात्र प्रशासनाने दिली नसल्याने खासदार वानखडे व यशोमती ठाकूर संतापल्या. त्यांनी पालकमंत्र्यांना झालेला सगळा घटनाक्रम सांगितला. यावेळी आ.प्रवीण पोटे (पाटी यांनी देखील मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला.
उपस्थित जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी चाबी विषयी चकार शब्द न काढल्याने यशोमती ठाकूर यांचा पारा चढला. आणि आंदोलन करून कुलूप फोडणार व काय गुन्हे दाखल करायचे ते करा असा इशारा प्रशासनाला दिला. आणि शासन प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करून कार्यालयाचे कुलूप फोडले,आणि कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी शहराध्यक्ष बबलू शेखावर, माझी महापौर विलास इंगोले, बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, प्रवीण मनोहर, वैभव वानखडे, योगेश देशमुख यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.