सामाजिक

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पारनेर तालुका कार्यकारिणी जाहीर , सचिव पदी कोरडे यांची निवड .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पारनेर तालुका कार्यकारिणी अध्यक्ष संतोष तांबे यांनी जाहीर केली असून तीत २१ जणांचा समावेश करण्यात आला आहे .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे हे होते , तर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष संतोष तांबे यांनी निवडी जाहीर केल्या , सचिव पदी हिवरे कोरडा चे संतोष कोरडे , सहसचिव पदी गुणोरे चे ॲड सोमनाथ गोपाळे , उपाध्यक्ष पदी जातेगाव चे विशाल फटांगरे , टाकळी ढोकेश्वर चे वसंतराव रांधवण , निघोज चे ठकसेन गायखे , खजिनदार पदी अळकुटी चे नितीन परंडवाल , इलेक्ट्रॉनिक्स मिडीया प्रमुख पदी वडझिरे चे महेश शिंगोटे , प्रसिद्धी प्रमुख पदी पिंपरी जलसेन चे चंद्रकांत कदम , संपर्क प्रमुख पदी पळवे बुद्रूक चे सुदाम दरेकर , निघोज शहराध्यक्ष पदी सचिन जाधव , तर कार्यकारिणी सदस्य म्हणून निघोज चे सुधीर पठारे , संपतराव वैरागर , दिपक वरखडे , प्रविण वराळ , भगवान श्रीमंदीलकर , टाकळी ढोकेश्वरचे गंगाधर धावडे , अळकुटीचे रामदास नरड , कान्हुर पठार चे सदानंद सोनावळे , पिंपळनेर चे संदीप गाडे , पारनेरचे भगवान गायकवाड, तर मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे , जिल्हासचिव सुरेश खोसे पाटील व सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर सर यांची निवड करण्यात आली . या निवडी बिनविरोध व खेळी मेळी च्या वातावरणात पार पाडल्या .
राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ वसंतराव मुंडे व प्रदेशाध्यक्ष डॉ . विश्वासराव आरोटे यांच्या आदेशाने ही पारनेर तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली . राज्य पत्रकार संघाच्या वतीने पारनेर तालुक्यात गुणवंत विद्यार्थी सत्कार , वही वाटप , वृक्ष लागवड , रक्त गट शिबीर , डोळ्यांचे शिबीर व इतर अनेक उपक्रम राबविण्याचे यावेळी ठरविण्यात आले .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close