सामाजिक

अखिल तेली समाज शाखा वाडी तर्फे नवनियुक्त ठाणेदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

Spread the love

वाडी ( नागपूर ) / प्रतिमिधी

श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखेद्वारे दि.20/02/2024 ला वेळ संध्याकाळी 7.15वा. वाडी पुलिस स्टेशन मध्ये नवीन स्थानापन्न झालेले आदरणीय राजेशजी तटकरे साहेब वरिष्ठ पुलिस निरीक्षक वाडी यांचा समाजातील वाडीतील प्रसिद्ध उद्योजक पुरूषोत्तम लिचडे,संघटनेचे संस्थापक अनिल बजाईत,मही.शहराध्यक्ष सौ वैशाली दहाघाणे, शहराध्यक्ष अनिल पुंड,चेतन वरटकर यांचे हस्ते पुष्षगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.वाडीतील नागरीकांची समस्या सामाजिक जिम्मेदारी समजुन बारावी तथा दहावी बोर्ड परीक्षेच्या कालावधीत भोंगे,साऊंड सिस्टीम ,तथा डिजेवरती सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार वेळेचे बंधनाचे काटेकोरपणे पालन करविण्याबाबत संघटनेच्या माध्यमातून नवनियुक्त वरीष्ठ पोलिस निरिक्षक आदरणीय श्री राजेश तटकरे साहेब यांना निवेदन देऊन पोलिस प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावरती सकारात्मक कारवाई करण्यात यावी.जेणेकरून वाडी परीसरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल.अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखेद्वारे करण्यात आली.संस्थापक अनिल बजाईत,सचिव चेतन वरटकर तथा उपस्थित पदाधिकारी शहराध्यक्ष अनिल पुंड,मही.शहराध्यक्ष वैशाली दहाघाणे, पुरूषोत्तम लिचडे,उमेश साहु, मनोज भिवगडे,संतोष दायमा,शरद साखरकर,अनिल दहाघाणे,मनोज भुरे, हरपालप्रसाद साहु, सचिन लिचडे,मंगेश माहुरे,ई.उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close