आरोग्य व सौंदर्य

परफेक्ट लूक साठी करा या ट्रिक चा वापर

Spread the love

 मेकअप ही एक कला आहे. ज्यामध्ये प्रत्येक प्रॉडक्टचा योग्य वापर केल्यास चेहरा परफेक्ट आणि सुंदर दिसू शकतो. जर तुम्हाला ब्लशर आणि फेस काँट्युरिंग लावण्यात त्रास होत असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.

या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही पार्लरसारखा मेकअप घरी सहज करू शकाल. तसेच पार्टीला जाताना तुम्ही परफेक्ट लूकमध्ये दिसाल. योग्य पद्धतीने मेकअप केल्यास तुमचा लूक आणखी आकर्षक बनतो. तसेच मेकअप करताना थोडीफार गडबड झाली तर ते तुमचा लूक खराब करू शकते. त्यामुळे घरी परफेक्ट मेकअप करण्यासाठी या काही ट्रिक्स तुमची मदत करतील. जाणून घ्या चेहऱ्याचा परफेक्ट शेप मिळवण्यासाठी कोणत्या स्मार्ट मेकअप ट्रिक्स फॉलो कराव्या.

ब्लशर लावण्याची ट्रिक

ब्लशर लावताना गालाचा योग्य भाग निवडला नाही तर चेहरा विचित्र दिसेल. तसेच ब्लशमुळे चेहरा सुंदर दिसण्याऐवजी खराब दिसेल. जर तुम्हाला ब्लशर परफेक्ट पद्धतीने लावायचा असेल तर तुमच्या बोटांचे नीट माप घ्या. पहिले बोट आणि अंगठा उघडा आणि उर्वरित बोटे बंद करा. आता हाताचे पहिले बोट नाकाजवळ ठेवा. जेणेकरून अंगठा कानाच्या वरच्या भागाला स्पर्श करेल. यामुळे हाताने चेकचा आकार तयार होईल. आता ब्लशर घ्या आणि हाताच्या बोटाला आणि अंगठ्याला टच करत लावा. आपले हात काढून ब्लेंड करा. यामुळे ब्लशर योग्य ठिकाणी येईल आणि तुमचा चेहरा परफेक्ट दिसेल.

गाल अधिक बारीक दिसण्यासाठी काँट्युरिंग करण्याची योग्य पद्धत

जर तुम्हाला गालांना ब्राउन शेडने काँट्युरिंग करायचे असेल पण योग्य पद्धत माहित नसेल तर ही ट्रिक ट्राय करून पहा. फक्त पहिले बोट कानाजवळून गालावर तिरक्या पद्धतीने ठेवा आणि त्यावर ब्राऊन शेड लावा. नंतर ते चांगले ब्लेंड करा. ब्लश आणि गालाचे काँट्युरिंग सहजपणे होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close