सामाजिक

योग हा जगाला शांतता सौहार्दाला प्रोत्साहन देण्याचा मार्ग -ब्रम्हकुमारी रश्मीदिदी

Spread the love

वर्तमान क्षणांवर लक्ष आणि तणाव नकारत्मता सोडण्याचे योग शिकवितो :

 

हिवरखेड : येथील प्रजापीता ब्रम्हकूमारी विश्र्वविद्यालय संचालीत मुख्यओमशांती शाखेत प्रात वंदन मुरली नंतर योग दिन कार्यक्रमात योग प्रंसगी बोलल्या यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार बाळासाहेब नेरकर , ऊच्च विध्याभूषन कू आश्र्विनी मोरोकार , सौ. येऊल ताई होत्या योगाचे प्रात्यक्षिक करतांना प्रातकाळची आरोग्यदायी हवा। मानवते सदा सर्वदा जिवा असे ग्रामगितेमधे वंदनीय राष्ट्रसंत सांगुन गेले अश्या सौ येऊल ताई बोलल्या तर योगाचा ऊगम हा भारतात हजारो वर्षापुर्वी झाला असून भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे योग हा एक सराव असून योगसाधने मूळे तुमचे शरीर आणि मन त्या परमात्म्याशी जोडण्याचा दुवा आहे , असे बाळासाहेब नेरकर यांनी योगा प्रात्यक्षिक करतांना सांगीतले
नियमीत योग साधना केल्याने शरीर निरोगी व मनाला शांतता लाभते असे आश्विनी मोरोकार यांनी सागींतले यावेळी ओमशांंती शाखेतील सर्व लहान थोर माता भाईलोक यांनी या योगा कार्यक्रमाला ऊपस्थीती दर्शवीली वरील कार्यक्रम देवीदास ईखार मनोहर दुंतोडे देविदास फोप्से श्रीमती चंदाताई, मंदाताई फोप्से सौ मानसेताताई अढीयाताई विलास झगडे, सतोंष शर्मा,गजानन येऊल, मोहनभाई मानसेता विजय मानसेता, नंदाबाई सौदे,विष्णु रेखाते,गंगुताई हागेताई शंकर ईखार लिटील मास्टर मामनकर यांचे सहयोगाने योगदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close