सराईत दुचाकी चोरटा पोलिसांच्या ताब्यात
संग्रामपूर – येथील फिर्यादी पवन प्रभाकर वानखडे यांची हिरो स्पलेंडर मोसा क्र MH 28 BC 9705 ही घरासमोरुन दि. 13/05/2024 रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली वरुन पोलीस स्टेशन तामगांव येथे अप.नं. कलम 379.34 भादंवि प्रमाणे दाखल आहे.नमुद गुन्ह्यात पोलीसांनी आरोपी शेख जाकीर शेख जाहाबाज रा-हिवरखेड बगीचा प्लाट ,याला संगामपुर न्यायालय यांचे वारंट आदेशाने कारागृह बुलढाणा येथुन ताब्यात घेतले. पोलीसांनी आरोपी शेख जाकीर शेख जाहाबाज रा-हिवरखेड याला न्यायालय संग्रामपुर येथे पेश केले असता त्याला पिसीआर देण्यात आला आहे. पिसीआर दरम्यान तामगांव पोलीसांनी आरोपी याची कसून चौकशी केल्याने आरोपी याचे कडुन पवन प्रभाकर वानखडे यांची चोरी गेलेली मोटरसायकल क्र.MH 28 BC 9705 जप्त केली आहे. नमुद आरोपी याचे कडुन आता पर्यंत ही दुसरी मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. यापुर्वी आरोपी कडून हिवरखेड अकोट रोडवर हिवरखेड ट्रफीक पोलीस हवालदार धिरज साबळे यांनी चोरीची मोटर सायकल मधे आठ महीन्याअगोदर काटेल ची कूकडे यांची चोरलेली मोटर सायकल मागील हप्त्यात सदर आरोपीला पकडुन तामगाव पोलीस च्या हवाली केला होता तामगाव हे पोलीस स्टेशन अभिलेखावरील चोरी गेलेल्या मोटरसायकल बाबत नमुद आरोपी याचे कडुन अधिक तपास करीत आहे त्यामूळे बरेच गुन्हे ऊघडकीस येन्याची शक्यता आहे पळशी झाशी येथील गोपाल वाघ याची सूद्दा गाडी चोरी गेली आहे तालूक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन मधे सूद्धा गाडी चोरीची घटना नोंद आहेत तर ईतर गाड्याची पण चौकशी व्हावी. सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक सा. श्री कडासने सर. मा.अपर पोलीस अधिक्षक सा खामगांव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा मलकापुर यांचे मार्गदर्शनाखाली स. पो.नि. राजेंद्र पवार ठाणेदार सफौ रामकिसन माळी बनं 1558, नापोका संतोष गाडे बनं 207, चालक पोका हिवराळे ब नं 2275 यांनी केली आहे