राजकिय

पहा कोण म्हणाले असे.. मोदी हा ब्रँड होता आता त्याची ब्रॅंडी झाली आहे

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क

                लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना उबाठा गटात नवचैत्यन्य संचारले आहे. दरम्यान शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन दोन्ही गटाकडून साजरा करण्यात आला. ठाकरे गटाच्या सोहळ्यात खा. संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वस्त्रोहरण केले आहे.

मोदी चारशे खुळखुळे जन्माला घेऊन आले होते. 400 पार हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, पण मोदींचा खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत म्हणाले की, आजचा दिवस ऐताहासिक आहे, फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी आपण मारली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या फडतूस माणसांसमोर आम्ही झुकणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदी चारशे खुळखुळे घेऊन जन्माला आले होते. 400 पार हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, पण मोदींचा खुळखुळा महाराष्ट्रात जर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला आहे, असे म्हणत संजय राऊत महाराष्ट्रात ठाकरे गटाला मिळालेल्या यशावर भाष्य करत भाजपावर टीकास्त्र सोडले.

संजय राऊत म्हणाले की, असंख्य हुतात्माच्या बलिदानतून शिवसेना स्थापन केली, पण आता गुजरातचे सोमे गोमे आले आहेत. महाराष्ट्राचा वारसा उद्धव ठाकरे यांनी चालवला आणि लोकसभेत यश मिळवलं. पण भाजपा आता आभार यात्रा धन्यवाद यात्रा काढणार आहे. आभार कशाबद्दल? पराभवाबद्दल मानणार आहात का? 400 पार करणार होते, पण तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तुम्ही हरलाय आणि आभार यात्रा काय काढताय? असा प्रश्नांचा भडीमार संजय राऊत यांनी भाजपावर केला.

मोदी हा ब्रँड होता, पण आता ब्रँडी झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, मोदी हा ब्रँड होता, पण आता ब्रँडी झाली आहे. बहुतेक ही आता देशी ब्रांडी झाली आहे. मोदींना आता राम दिसला असेल, पण रामाने त्यांना लाथ घातली असेल. कारण, त्यांचं हिंदुत्व नकली होतं. सत्ते पे सत्ता लागला असला तरी आता त्यांचा आकडा महाराष्ट्रमध्ये लागणार नाही, असे म्हणते त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ठाकरे गटाचा कसला स्ट्राईक रेट विचारता. स्ट्राईक रेट तुमच्या बेईमानाचा वाढला आहे. लोकसभा निवडणुकी तुम्ही 7 जागा जिंकलात, पण त्यात अमोल कीर्तीकरांची जागा आपण जिंकलो, असा दावा संजय राऊत यांनी केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close