सेवाग्राम मेडिकल चौक येथे हमदापुर मार्गावर प्रवासी निवारा देण्यात यावा.- आप ची मागणी
वर्धा / आशिष इझनकर
वर्धा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या नेतृत्वात मुख्य अभियंता बांधकाम विभाग, वर्धा यांना सेवाग्राम येथील मेडिकल चौक मध्ये हमदापुर मार्गाच्या दिशेने प्रवासी निवारा देण्यात यावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली.
सदर सेवाग्राम ते हमदापुर या गावा कडे जाताना, सेवाग्राम पासुन अंबानगर, खरांगणा (गोडे), कूटकी, तळोदी, तुळजापूर, वघाळा, चानकी कोपरा, शिवनगाव, देऊळगाव, जुनोना, पिंपळगाव, आजगाव, पहेलनपुर, चिंचोली, रज्जाकपुर आणि हमदापुर खेरीज अनेक छोटी मोठी गावे आहे, या गावातील ग्रामस्थांना सेवाग्राम येथे वैद्यकीय किंवा अन्य कामा करिता आले असता, गावी परत जाण्यासाठी बस किंवा ऑटो च्या माध्यमातून गावाला परत जाता येते, या करिता त्यांना सेवाग्राम येथे मेडिकल चौकात, बस किंवा ऑटो ची वाट बघण्या करिता उन्ह, पाऊस, वाऱ्यात उभे राहावे लागते, त्यात ही या मार्गावर आवागमन करणाऱ्या बस फेऱ्यांची संख्या समाधानकारक नसल्याने, भरपूर वेळेच्या अंतराने वाहनांची आवा-जावी होते, या दरम्यान वृध्द व्यक्ती, तान्हे लेकरे घेउन माता बघीनी, महिला, पुरुष ताटकळत उन्हात, वाऱ्यात, पावसात मेडिकल चौकात जागा भेटेल तिथे निवारा बघुन बस ची वाट बघतात, या अनुषंगाने जर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुढाकार घेऊन सेवाग्राम मेडिकल चौक येथे सेवाग्राम हमदापुर मार्गाच्या दिशेने प्रवासी निवाऱ्याची निर्मिती केली तर सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल.
मा.कार्यकारी अभियंता श्री.सतीश आंबोरे साहेब यांनी स्वतः कॅबिन मधुन बाहेर येऊन निवेदन स्वीकारले आणि बाहेरच्या बाहेरूनच निवेदकांना मार्गी लावले, त्यांच्या या कार्य शैलिने त्यांची कामाच्या बाबतीत असलेली समय सूचकता बघता, सार्वजनिक बांधकाम विभाग या निवेदनाची दखल घेऊन योग्य कार्यवाही करून लवकरात लवकर प्रवासी निवर्याच्या निर्मितीचा मार्ग मोकळा करतील अशी अपेक्षा आप जिल्हाध्यक्ष श्रीकांत ब दोड यांनी व्यक्त केली.
निवेदन सादर करताना संजय आचार्य,कुणाल लोणारे, अभिलाष डाहुले, सुनील शामडीवाल, सुर्या सोनोणे, स्वप्नील पाठणकर, गणेश ठाकरे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.