सामाजिक

यवतमाळ  शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ? नगर परिषदेचे दुर्लक्ष

Spread the love
अरविंद वानखडे
यवतमाळ (वार्ता)
 शहरातील वाहनांची अवस्था अशी झाली आहे.की वाहने चालविताना खड्ड्यातून रस्ते शोधावे लागत आहे. त्यामुळे वाहन चालक यांना नाहक त्रास होत असून रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.हे खड्डे नागरिकांचा जीव घेण्यासाठी ठेवले आहे का?असा संताप जनक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
यवतमाळ शहरातील विविध भागांच्या अनेक रस्त्यांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून या खड्ड्यांमधून रस्ता शोधत आपल्या ठिकाणी पोहचणे जोखमीचे काम झाले आहे. शहरात अनेक भागातील रस्त्यावरील गड्डे बुजविण्याचा पालिकेकडून दावा केला जात असताना अद्यापही अनेक भागात आलेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पाण्याने भरलेले दिसत आहे.त्यामुळे वाहन चालविताना या खड्ड्यांना चुकवत रस्ता शोधावा लागत आहे.
मृगनक्षत्राच्या पावसाने काही प्रमाणात सरी जरी बरसविला आहे.व या अल्पशा पाण्याने नागरिक जरी सुखावला असला तरी शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मार्ग काढत नोकरीच्या ठिकाणी किंवा आपल्या कामावरती पोहोचण्याकरिता नागरिकांना डोळ्यात पाणी शिंपडून रस्ता पार करावा लागत आहे. शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवण्यासाठी
नगरपालिकेकडे आर्थिक तरतूद असून सुद्धा पावसाचे आगमन होत असताना रस्त्यावरील खड्डे का बुजविले जात नाही. तसेच रस्त्यावर गुडघ्या इतके पावसाचे पाणी साचेल व त्यातून मार्ग कसा काढावा ही वेळ येण्याआधी नगर परिषद हे रस्ते का बुजवीत नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
आता तरी पावसाने मोठ्या प्रमाणात बरसने सुरू केले नाही.त्यामुळे तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची यंत्रणा नगरपालिकेने राबवावी अन्यथा याच रस्त्यावर उतरून नगरपरिषद विरोधात आंदोलन करावे लागेल.असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे.
नगरपरिषद यांना खड्डे बुजविण्याचा जाग येईल का?
यवतमाळ नगरपरिषद ही आपल्या  प्रशासकीय कामासाठी प्रसिद्ध आहे. आता शहरात सर्व बाजूंनी अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे.मात्र या मोहिमेत फिरणाऱ्या नगर परिषदेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला रस्त्यावर पडलेले खड्डे दिसून येत नाही का?
त्याकरिता चार चाकी गाडीने फिरून जमणार नाही तर दुचाकी गाडी घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्याने यवतमाळ शहरात फेरफटका मारावा.
नुकताच सुरू झालेल्या पावसामुळे
रस्त्यावरचे खड्डे त्यामध्ये भरलेले पाणी त्यामुळे नागरिकांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  यवतमाळ येथील दत्त चौक अतिशय वर्दळीचा रस्ता असून सुद्धा तेथे खड्ड्याचे साम्राज्य      आहे. अल्पशा पाण्याने इथे सर्वत्र पाणी साचले जाते. तसेच स्टेट बँक चौक ते वंजारी फैल रोड, गांधी चौक ते अप्सरा टॉकीज रोड, बांगर नगर पेट्रोल पंप समोर तसेच जामनकर नगर येथे अशा वर्दळच्या ठिकाणी नगरपरिषद कधी लक्ष देणार एखाद्याचा जीव गेल्यावर का? असा सवाल संभाजी ब्रिगेड चे सुरज खोब्रागडे यांनी केला आहे. लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने आंदोलन करणार असा पवित्रा घेतला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close