विद्यार्थी रमले जुन्या आठवणीत , केदारेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पारनेर तालुक्यातील बाभूळवाडे च्या केदारेश्वर विद्यालयाच्या १९८८-९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
या मेळाव्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते १९९८-९९मधील दहावीत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय लोंढे सर उपस्थित होते .त्यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले, तसेच विद्यालयामध्ये सर्वप्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांनी रोख स्वरूपात रक्कम देऊन सन्मानित केले आणि विद्यालयास ११,१११ रुपयांची देणगी भेट म्हणून दिली. प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष ठुबे सर, सिताराम बापू बोरुडे सर , सोनवळे सर , सोमनाथ नाळे सर , राऊत सर मराठी शाळेचे कैलास ठुबे, जाधव गुरुजी, विश्वास जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते .
सर्वांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाची संघर्षमय कहानी वर्णन केली आणि सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. जुन्या आठवणीने सरांचा उर भरून येत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक कवडे यांनी केले तर माजी विद्यार्थिनी मंगल पोटे , वैशाली पोटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे आभार १९९८-९९ विद्यार्थी निवृत्ती जगदाळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी निवृत्ती जगदाळे,अशोक कवडे ,उत्तम शिर्के यांनी विशेष परिश्रम घेतले.