अंजी नृसिंह येथे वीज कोसळून दोन म्हसी ठार
घाटंजी ता.प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी पासून ३ कीमी अंतरावर असलेल्या अंजी (नृसिंह) शेतशिवारात ६ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट झाला. यामध्ये वीज कोसळून दोन म्हशी ठार झाल्याची घटना घडली. अंजी नृसिंह येथील शांता कंठाळे यांच्या शेतात बांधून असलेल्या दोन म्हशीवर अच्यानक वीज पडल्याने दोन्ही म्हशीचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अंदाजे एक लाख २० हजारांचे नुकसान झाले. याच शेतात संजय वगारहांडे व त्यांच्या पत्नी बैलगाडीमध्ये कडबा भरून येत असतानाच गडगडाटा सह २० फुटावर ही वीज कोसळली दैव बालोतरा म्हणून दाम्पत्य बचावले. सदर घटना नजरेसमोर घडल्याने त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. या घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी लोकांनी धाव घेतली व या घटनेची माहिती तलाठी यांना दिली. तलाठी बाबरे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. तसेच अहवाल तहसीलदार, घाटंजी यांना पाठविल्याच कळते. दोन म्हैस ठार झाल्यामुळे मात्र संकट कोसळले असून, नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
०००००००००००००००००००