राजकिय

लोकसभेची मतमोजणी जवळ आल्याने गावपुढारी सलाईनवर !

Spread the love

खासदार कोण? विखे की लंके ?

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. यातील मतमोजणीची तारीख मंगळवार दि ४ जसजशी जवळ येऊ लागली आहे. तस तशी गाव पुढाऱ्यांची झोप उडाली असून त्यांना सलाईन लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खासदार कोण ? विखे की लंके ? हा सर्वसामान्य मतदारांना पडलेला प्रश्न आहे .
मागील महिन्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर, गावोगावी विखे व लंके या उमेदवारां चे समर्थक व कार्यकर्त्यां मध्ये आपल्या नेत्यांना आपापल्या भागातून किती मतदान होईल व तेही कसे होईल, याबाबत बिनधास्त छाती ठोकपणे आकडेवारी सांगितली गेली आहे . या आकडेवारीमध्ये आपल्यावरील आपल्या नेत्याची मर्जी कायम राखण्यासाठी चांगले मतदान करून घेतल्याची बतावणी करण्यात येत आहे . आता याबाबतचा अंतिम फैसला करण्याची तारीख अगदी जवळ येऊन पोहोचली आहे. येत्या मंगळवार दि . ४ रोजी संपूर्ण देशभरातून कोणाला किती जागा मिळणार व कोण किती मताधिक्याने विजयी होणार हे स्पष्ट होणार आहे .अंदाजात कोणी किती खोटे आकडे दिलेले असले, तरी तेही या निकाला ने उघडे पडणार आहे .आता लवकरच कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या मर्जीसाठी सांगितलेल्या आकडेमोडींचे पितळ उघडे पडण्याचे दिवस जवळ आले आहेत .लोकसभा निवडणुकीच्या निकालाने अंदाजाचे पितळ उघडे पडणार आहे. मंगळवा दि . ४ ची मतमोजणी पार पडताच मतदान केंद्र निहाय पडलेल्या मतांची आकडेवारी समोर येणार आहे.त्यामुळे खा विखे वा मा . आ . लंके यांना गावा गावातील मतदारांनी किती प्रतिसाद दिला आहे, हे स्पष्ट होणार आहे. पूर्वीसारखे मतपत्रिकेवरील मतमोजणी नसल्यामुळे मतमोजणी लवकरच पार पाडून निकाल ही लवकरच हातात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक केंद्र निहाय जबाबदारी स्विकारलेले गावपुढाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार आहे. या पार पडलेल्या या निवडणूकीत खा . विखे यांच्या सत्ताधारी महायुतीला मोठ मोठे नेते आपल्या बाजूला ओढण्यास यश मिळाले . त्याचा परिणाम म्हणून त्याच धर्तीवर खा . विखे व मा . आ . लंके यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बेरीज करून आपल्या नेत्याला किती मतदान पडणार हे दाखविण्याचा आटा पिटा दिसून येत आहे. यामुळे
महायुती की महाविकास आघाडी कडे मतदारांनी कौल दिला हे मंगळवा दि . ४ तारखेला दुपार पर्यंत स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीकडे नेत्यांची कमतरता जाणवत होती. महागाई. बेरोजगारी, शेतकरी विरोधी धोरणे, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील दुफळी त्यातून निर्माण झालेली शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष त्यातून त्यांच्या बाबतची सहानुभूती, मुस्लिम समाजाकडून झालेले मोठे मतदान या सर्व गोष्टींचा विचार करता मतदारातील मोठी जागृती दिसून येते . यामुळे नेते नसतील तर मतदार असतील. याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल का , हे ही स्पष्ट होईल .
तसे पाहता लोकसभा निवडणूक खा .विखे यांना एक हाती व सोपी वाटणारी ही निवडणूक , मा . आ . लंके यांच्या उमेदवारी मुळे अटीतटीची झाली आहे . यापूर्वी लोकसभा उमेदवार हे फार तर तालुक्याच्या किंवा मोठ्या गावांमध्ये सभा होत असे , पण यंदा मात्र मा . आ . लंके यांनी संपूर्ण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अक्षरश : पायाला भिंगरी लावून पिंजून काढल्याने, खा . विखे यांनी ही प्रवरेच्या यंत्रणेद्वारे व महायुती त समाविष्ट झालेल्या मोठमोठ्या नेत्यांमार्फत प्रत्येक गावांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी ही झाला . या निवडणूकीत प्रचंड व्यक्तिगत रित्या आरोप , प्रत्यारोप झाल्याने मोठी धुम्शचक्री पाहायला मिळाली , या आधीच्या लोकसभा निवडणुकीत अशी पद्धत अवलंबली गेली नव्हती , पण येथून पुढच्या सर्वच निवडणूका अगदी सेवा संस्था , ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद , विधानसभा निवडणूकांमध्ये रणधुमाळी उडणार आहे . आर्थिकदृष्ट्या तर सर्वच अवघड झाले आहे , आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनीच निवडणूका लढव्यात , कमकुवत असलेल्यांनी कार्यकर्ते व नेत्यांनी थांबलेले चांगलेच !

 

दोन्ही बाजूंनी विचार केला असता , कोणता उमेदवार निवडून येईल. कोणत्या बाजूला मतं मिळेल , हे संपूर्ण मतमोजणी नंतर च समजेल. परंतु आपल्या भागातून झालेल्या मतदानाचा अंदाज सांगून टाकलेल्या गावपुढाऱ्यांची झोप उडाली असून त्यांना सलाईन लावण्याची वेळ आली आहे . ]

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close