सामाजिक

ख्यातनाम गायिका मंजुषा शिंदे  यांच्या बहारदार गीताने आर्वीकर मंत्रमुग्ध 

Spread the love

 

मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाकरिता गर्दी

जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे व महासचिव सुरेश भिवगडे यांच्या सूत्रबद्ध नियोजनाने कार्यक्रम यशस्वी झाल्याची सर्वत्र चर्चा 

आर्वी / प्रतिनिधी

दिनांक 24 मे 2024 ला विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी द्वारा बुद्ध जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त जयंती दिनानिमित्ताने गांधी चौक आर्वी येथे संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका मंजुषा शिंदे यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांनी सर्व आर्वीकरांची मने आपल्या गीतातून जिंकून घेतले.
लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबांमुळे हे सुप्रसिध्द गीत
तसेच तुझ्या हिमंतीने घडलाय इतिहास नवा तेव्हा बहुजनांच्या घरी लागलाय दिवा आई रमाबाई यांच्या जीवनावर आधारित गीतांनी लोकांना मंत्रमुग्ध केले. *जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे यांच्या सूत्रबद्ध नियोजनाने कार्यक्रम यशस्वी झाल्याची सर्वत्र चर्चा*
यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामीण शहरी भागातील लोकांची उपस्थिती होती.
प्रचंड गर्दीने या कार्यक्रमाला यशस्विता प्राप्त करून दिली.
सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांना सन्मानपत्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन जयंती समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे
व जयंती समितीचे महासचिव सुरेश भिवगडे कोषाध्यक्ष पंकज भीमके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने सुद्धा मंजुषा ताई यांचा सत्कार करण्यात आला या सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी भारतीय संविधानाची प्रत भेट दिली तर प्रज्ञा शील करुणा या ग्रुपने त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबारावजी सोमकुवर व समितीचे सहसचिव प्रमोद चौरपगार व माझी रमा माझी रमा या गीतात अभिनय करणारी आर्वी शहरातील *दिशा प्रमोद डोळस* यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक बाबारावजी सोमकुवर यांना समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या संगीतमय कार्यक्रमाचे उद्घाटन ओमप्रकाश पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.पंकज वाघमारे
प्रमुख अतिथी बाळाभाऊ जगताप प्रवीण तंबाखे समाज सेविका शुभांगी भिवगडे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक बाबारावजी सोमकुवर तर प्रमुख उपस्थिती प्रकाश बनसोड प्रा डॉ प्रवीण काळे सिद्धार्थ मुंद्रे प्रमोद भिवगडे कपिल लांडगे दिनेश सवाई प्रा. राजेश सवाई प्रा. डॉ. अनिल भगत
देवानंद डोळस इत्यादी जण होते.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आकांक्षा नळे यांनी केले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे समितीचे महासचिव सुरेश भिवगडे
कोषाध्यक्ष पंकज भीमके
प्रशांत मात्रे गौतम कुंभारे
अमोल दहाट गौतम मेश्राम
प्रवीण काळे प्रमोद चौरपगार रहूपाल नाखले
संघटक रवी गाडगे, अनिकेत बांबुळकर, संदीप दहाट आकाश सवाई
सल्लागार सुखदेवराव नंदागवळी
प्रा. पंकज वाघमारे
ओमप्रकाश पाटील प्रकाश बनसोड दीपक ढोणे प्रशांत सूर्यवंशी अरुण पानेकर. ई सहकार्य केले
तर पूजा स्थान सजविण्यासाठी
सूरज मेहरे अभिषेक भिवगडे सचिन मनवरे स्वप्नील फुलोके
प्रमोद चौरपगार यांनी मदत केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close