सामाजिक
शिक्षक भारतीच्या वतीने सावित्री फातिमा अभिवादन सोहळा उत्साहात साजरा
मुंबई, (विशेष प्रतिनिधी ) :
आज शिवाजी नगर, गोवंडी इंडियन ऑईल नगर येथे आमदार अबू आजमी यांनी बांधलेल्या सावित्री फातिमा चौकात शिक्षक भारती संघटनेने सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्री फातिमा अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात व अप्रतिम पद्धतीने साजरा केला.
यावेळी विशेष पाहुणे आमदार अबू असीम आझमी, आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे, शिक्षक भारतीचे कार्यवाह प्रकाश शेळके, मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे, मुंबई मनपा नगरसेविका रुखसाना सिद्दीकी, नगरसेवक इरफान खान, नगरसेविका आयेशा रफीक शेख, शिक्षक भारती उत्तर विभाग अध्यक्ष अकबर खान यांच्यासह मुंबईतील अनेक पदाधिकारी, विविध शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1