पुढच्या पिढी करता संपत्ती कमावून ठेवण्यापेक्षा ती संपत्ती टिकेल कशी एवढे मुलाना संस्कार द्या

ह भ प उमेश महाराज जाधव
बांल संस्कार शिबिर नांदगाव खंडेश्वर येथे प्रतिपादन
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
श्री खंडेश्वर बाल सर्वांगीण विकास शिबिर नांदगाव खंडेश्वर येथे बोलत असताना शिबिर संचालक ह भ प उमेश महाराज जाधव यांचे प्रतिपादन शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ह भ प श्री उमेश महाराज जाधव यांनी अनेक विषयांना मुलांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते संवाद साधत असताना बोलत होते अलीकडच्या काळामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण आपण झपाट्याने करत आहोत त्यामुळे उद्याचा तरुण आणि आजचा बालक मोबाईल चे व्यसन आणि फॅशन याच्या आहारी गेलेला पाहायला सापडतो म्हणूनच बालवयामध्ये मुलावर संस्कार करणे हे आई-वडिलांचं फार मोठं कर्तव्य आहेत, असे महाराज बोलत होते जर घरातूनच आई-वडिलांच्या माध्यमातून हे संस्कार मुलांवरती रुजवण्यात आले तर भविष्य काळामध्ये आपले पाल्य आपल्याला सुसंस्कारित बघायला मिळतील त्याकरता म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना एक सुवर्णसंधी बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होते आणि जाणीव असलेले आई-वडील आपल्या मुलांना या बाल संस्कार शिबिरामध्ये संस्कार संपन्न होण्याकरीता दाखल करतात आज श्री खंडेश्वर बाल सर्वांगीण विकास शिबिरामध्ये जवळपास १८० विद्यार्थी सुसंस्काराचे धडे घेत आहे संस्कारासंबंधात जागृत असणाऱ्या आई-वडिलांचे आभार यावेळी बोलताना व्यक्त केले ,पुढच्या पिढी करता संपत्ती कमावून ठेवण्यापेक्षा ती संपत्ती टिकेल कशी एवढे संस्कार द्या त्यावेळी येथे शिबिर मुख्याध्यापक ह भ प सुरज महाराज पोहोकार शिबिर उपमुख्याध्यापक ह भ प भूषण महाराज गिरी शिबिर शिक्षण ह भ प ज्ञानेश्वर महाराज राणे ह भ प कार्तिक महाराज चवात ह भ प गौरव महाराज देठे ह भ प संकेत महाराज जोगे ह भ प विशाल महाराज मालगे चंदन गावंडे अमन मालवे तेजस राऊत अभिषेक पवार शिबिर व्यवस्थापक गोपाल काकडे व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते