शाशकीय
तत्कालीन एसडीएम रवींद्र राठोड , तहसीलदार भंडारा हिंगे आणि तहसीलदार नीलिमा रंगारी तडकाफडकी निलंबित
पोलीस पाटील पदभरती घोटाळा भोवला ; प्रशासनात खळबळ
भंडारा / राजू आगलावे
जिल्हा प्रतिनिधी
तत्कालीन उपविभागीय अधिकारी ( भंडारा ) रवींद्र राठोड हे पोलीस पाटील पदभरतीत दोषी आढळल्याने त्यांना आणि भंडारा येथील तहसीलदार अरविंद हिंगे व पवनी येथील तहसीलदार नीलिमा रंगारी यांना निलंबित करण्यात आले आहे. काही वेळापूर्वी मंत्रालयातून तसे आदेश भंडारा येथे धडकले आहेत. या आदेशाने जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील प्रशासनात खळबळ माजली आहे.
भंडारा उपविभागा मध्ये झालेल्या पोलीस पाटील पदभरतीत अनियमितता झाल्याच्या तक्रारी शासन आणि प्रशासन दरबारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात चौकशी चे आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांनी प्राथमिक चौकशी केली असता प्रथमदर्शनी त्यामध्ये तथ्य दिसून आल्याचे विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांचा दिनांक २०/०६/२०२३ अन्वये अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ८ अन्वये श्री. रविंद्र राठोड, तत्का. उप विभागीय अधिकारी, भंडारा यांच्याविरुध्द विभागीय चौकशीची कार्यवाही करण्याचे येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आता उक्त श्री. रविंद्र राठोड, तत्का. उप विभागीय अधिकारी, भंडारा , तहसीलदार अरविंद हिंगे व पवनी येथील तहसीलदार नीलिमा रंगारी यांना या आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे..
तिघांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचा आदेश – रवींद्र राठोड हे सध्या पालघर येथे एसडीओ असून त्यांना मुख्यालय पालघर, तर हिंगे यांना मुख्यालय भंडारा आणि सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे कार्यरत नीलिमा रंगारी यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे महसूल व वन विभाग, क्रमांक :- निलंबन २०२३/प्र.क्र. ११४/ई-४ महसूल व वन विभाग, पहिला मजला, दिनांक २७/०६/२०२३ या पत्रात नमूद आहे.
निलंबनाच्या कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता देण्यासंबंधी खालील आदेश देण्यात आले आहेत:–
निलंबनाच्या कालावधीत श्री. रविंद्र राठोड, तत्का, उप विभागीय अधिकारी, भंडारा , तहसीलदार अरविंद हिंगे आणि नीलिमा रंगारी यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किया धंदा करू नये. (त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल व तसे केल्यास ते निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील.
हे तपासल्यावर देण्यात येईल निलंबन भत्ता –
निलंबनाच्या कालावधीत त्यांना निलंबन भत्ता जेव्हा देण्यात येईल त्या प्रत्येक वेळी आपण खाजगी नोकरी स्वीकारलेली नाही किंवा कोणताही खाजगी चंदा या व्यापार करीत नाही अशा त-हेचे प्रमाणपत्र श्री. रविंद्र राठोड, तत्का उप विभागीय अधिकारी, भंडारा अरविंद हिंगे भंडारा आणि नीलिमा रंगारी सिंदेवाही ,( चंद्रपूर) यांना द्यावे लागेल,
महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ६८ मधील तरतुदीनुसार श्री. रविंद्र राठोड, तत्का. उप विभागीय अधिकारी, भंडारा , अरविंद हिंगे ,भंडारा , आणि नीलिमा रंगरी सिंदेवाही , चंद्रपूर यांना निलंबन निर्वाह भत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येतील.