निशुल्क उन्हाळी शिबिराला उत्सफुर्त प्रतिसाद
जेष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन
यवतमाळ प्रतिनीधी
दि 10 में रोजी श्री सिध्दि विनायक मंदीर जय विजय चौक येथे निशुल्क उन्हाळी शिबिराचे उद्धघाटन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले
मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा त्यांचे सर्वांगीण विकास व्हावे खेळता खेळता त्यांचे सामन्य ज्ञान वाढावे त्यांचा व्यायाम व्हावा किमान 2 तास मोबाइल टीव्ही पासुन दूर रहावे या उद्देशाने मागील १० वर्षा पासुन सुजित राय यांच्या संकल्पनेतुन श्री सिद्धिविनायक मंदीर जय विजय गणेशोत्सव मंडळ जय विजय चौक यांच्या पुढाकाराने निशुल्क उन्हाळी शिबिराचे आयोजन केल्या जाते यामध्ये डान्स चित्रकला हस्ताक्षर दुरुस्ती कार्यशाळा वक्तृत्व स्पर्धा देशभक्तीपर निबंध स्पर्धा सामान्य ज्ञान प्रश्नमंजुशा असे अनेक विषय कोणातेच शुल्क न घेता रोज संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत घेतले जाते या शिबिरा चे उद्धघाटन परिसरातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी रामनारायण मिश्रा , यादवराव ठाकरे , मधुकर देवतळे, देवराव कदम ,हर्षे काका , रतनलाल राय ,अशोक आसुरकर , कपिल डोइजड , सुरेश लोहाणा मुनीराज दिघाडे , गोपाल माहुरे , लता राय , स्नेहा संगावार , अर्चना पांडे , दुरतकर ताई , परिसरातील नगरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते शिबीरा साठी सुजित राय , संजय संबजवार , रितीक पाटील (abd dance group) , राजु बाहेकर , राहुल हरसुले , रोशनी राय , शीतल राय परिश्रम घेत असुन उन्हाळी सुटीत खेळता खेळता ज्ञान अर्जित करण्याच्या या उपक्रमाचे नागरिक कौतुक करत आहे